न्यायालय अनेकदा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वेगवेगळे निर्णय घेत असते. त्यामुळे अनेकदा न्यायालयाचा निर्णय चर्चेत येत असतो. आताही असेच एक प्रकरण समोर आले, जिथे न्यायालयाने एक हैराण करणारा निकाल दिला आहे. जो चांगलाच चर्चेत आला आहे. (after daughter death the property right is her husband and son)
न्यायालयाने वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हक्क असतो, हे तर सांगितल आहे. तसेच यावेळी न्यायालयाने जर मुलीचा मृत्यु झाला, तर तिच्या वडिलांच्या संपत्तीवर कोणाचा हक्क असेल हे ही सांगितले आहे. गुरुवारी ३१ मार्चला एका प्रकरणाची सुनावणी करताना दिल्ली न्यायालाने याबाबत निकाल दिला आहे.
गुरुवारी संपत्तीच्या वादावर सुनावणी करताना दिल्ली न्यायालयाने सांगितले की, मुलीच्या मृत्यूनंतरही वडिलांच्या संपत्तीमध्ये जावई आणि नातवाचा हक्क समजला जाईल. न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत मालमत्तेची विक्री किंवा अन्य कोणताही अधिकार दुसऱ्या पक्षाला देण्यास स्थगिती दिली आहे.
दिल्लीतील साकेत येथील न्यायमूर्ती नरेश कुमार लाकर यांच्या खंडपीठाखाली मालमत्तेच्या वादावर सुनावणी झाली. त्यादरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले. प्रत्यक्षात या प्रकरणात भाच्यानं आपल्या दोन प्रकरणांविरोधात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये आजोबांच्या मालमत्तेत मामाने हक्क दिला नाही, असे म्हटले आहे.
त्याचवेळी, न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले की, जर मुलीचा मृत्यू झाला असेल, तर तिच्या वडिलांच्या मालमत्तेत तिचा नवरा आणि त्याच्या मुलांचा हक्क आहे. या परिस्थितीत, मालमत्तेतील हिस्सा निश्चित होईपर्यंत इतर पक्ष मालमत्ता विकू शकत नाही.
तसेच याचिकाकर्त्याची आई तिच्या वडिलांच्या मालमत्तेची वारस होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत त्याचाही एक तृतीयांश भागावर हक्क असतो. त्याचबरोबर या प्रकरणाच्या पुढील तारखेपर्यंत संबंधित कार्यालयाने सर्व मालमत्तांचे मूल्यांकन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर पुढील आदेशापर्यंत मालमत्तेच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सांस्कृतिक पुण्याला धक्का! ती त्याला शिकवायला आली अन् त्याने थेट अश्लील व्हिडिओच काढला
पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांची होणार बदली? कृष्णप्रकाश यांच्याजागी येणार नांगरे-पाटील?
फक्त बुद्धिमानच लोक ‘या’ चित्रात किती बिबटे आहेत शोधून काढू शकतात; मग बघा तुम्हाला दिसतो आहे का?