राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भाजपने विरोधी पक्षाची भूमिका साकारली. मात्र ही भूमिका साकारत असताना भाजपने राज्य सरकारवर चांगलेच टीकेचे बाण सोडले. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत भाजप नेत्यांनी सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष केले.
भाजप नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांचे घोटाळे उघडकीस आणण्याचा जणू विडाचं उचलला होता. अगदी तसचं भाजप नेते हे आक्रमकपणे सत्ताधारी नेत्यांवर तुटून पडतं होते. आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत या दोन्ही नेत्यांनी गेल्या तीन वर्षात आक्रमपणे महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले.
यामध्ये एसटीचे विलिनीकरण, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षार्थींवरील अन्याय, कोरोना काळातील बळी, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न घेऊन भाजप नेते राज्य सरकार विरोधात रस्त्यावर उतरायचे. मात्र आता हेच चित्र थोडचं वेगळं पाहायला मिळत आहेत. राज्यात पुन्हा भाजप – शिंदे सरकार आल्यापासून आक्रमक नेते ही कमालीचे शांत झालेले पाहायला मिळतं आहे.
जाणून घ्या भापच्या नेत्यांनी मौन का बाळगले..?
मात्र आता जसं सत्तेत पुन्हा भाजप आलं. तसं हेच चित्र काहीच वेगळं पाहायला मिळतं आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर ही समाजातील बरेच प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. मात्र, ते सोडविण्याबाबत ‘ब्र’सुद्धा काढण्याचे धाडस आता भाजप नेते दाखवत नसल्याचे अलीकडे दिसून येतं आहे.
तर जाणून घ्या.. आताचे सत्ताधारी नेते महाविकास आघाडी सरकार असताना कोणत्या मागण्या करत होते. पुराचे संकट कायमस्वरुपी घालविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पूरग्रस्तांना भरीव मदत द्यावी, एसटीचे विलिनीकरण करावे, दूध दरात १० रुपयांची वाढ करावी, अशा अनेक मागण्यांसाठी भाजप नेते अनेकदा रस्त्यावर आले होते. मात्र आता सत्तेत आल्यापासून शब्द देखील काढत नाहीये.
महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्याच्या सभेला जेवढी जास्त गर्दी तेवढे जास्त पैसे मिळतील; मंत्री संदीपान भुमरेंच्या मुलाचे लोकांना आवाहन
त्यांना हाफकिन पण दलाल वाटला..; तानाजी सावंताच्या अज्ञानावरून आदित्य ठाकरेंनी झाप झाप झापले
“तू ठाकरे है, तो मैं भी….”, नवनीत राणा पुन्हा उद्धव ठाकरेंवर बरसल्या, वाचा नेमकं काय म्हंटलंय?