Share

कोठडीत सतत हसतोय आफताब; म्हणतोय ३५ तुकडे केल्याचा नाही पण ‘या’ एकाच गोष्टीचा होतोय पश्चाताप

aftab shraddha

मुंबईत झालेल्या श्रद्धा हत्याकांडाने फक्त राज्यातच नाही, तर देशभरात खळबळ उडवून दिली आहे. प्रियकर आफताबने (Aftab) श्रद्धा वालकर नावाच्या आपल्या प्रेयसीचा जीव घेतला आहे. त्याने ज्यापद्धतीने जीव घेतला आहे ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

श्रध्दा आणि आफताब हे दोघेही २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. आफताबने श्रद्धाचे तुकडे करुन घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. या धक्कादायक कृत्याने संपूर्ण देश हादरला आहे. प्रियकर इतका क्रूर असू शकतो यावर लोक विश्वास ठेवू शकत नाहीत. चक्क प्रियकराने त्याच्यासोबत राहणाऱ्या मुलीच्या शरीराचे ३५ तुकडे करू ते लांपास केले आहेत.

या गुन्ह्यासाठी आरोपी आफताबला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. तब्बल सहा महिने पोलिसांना चकमा देणारा अफताब आता तुरुंगात आहे. आफताबने आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर चोवीस तास नजर ठेवण्यात येत आहे.

दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वॉकर (वय २६) या तरुणीच्या हत्येप्रकरणी आणखी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी प्रश्न विचारताच आफताब फक्त मोठ मोठ्याने हसतो असे समोर आले आहे.

श्रध्दाची हत्या करायला नको होती. फक्त याच एकाच गोष्टीचा पच्श्राताप होतोय. मात्र, हत्या करून शरिराचे तुकडे केल्याचा मला कोणताही पच्श्राताप होत नाही, अशी माहिती चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांना दिली आहे.

दरम्यान, आफताबची अनेक महिलांशी मैत्री होती. तसेच तो त्यांच्याशी शारीरिक संबंध देखील ठेवत होता. एकावेळी आफताब फोन वर बोलत असताना श्रद्धाने ऐकले होते, असे देखील आफताबने सांगितले.

महत्वाच्या बातम्या – 

Mumbai : मला इथून घेऊन जा, नाहीतर आफताब आज रात्री मला; श्रद्धाचा शेवटचा मेसेज आला समोर

आफताबने श्रद्धाचा खून केल्यावर गुगलवर सर्च केल्या ‘या’ दोन गोष्टी; कबुलीनाम्यातून समोर आले भयानक सत्य

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now