AFG vs IND | आज भारताने अफगानिस्तानवर विजय मिळवला पण अडीच वर्षांपासून क्रिकेटचे चाहते विराट कोहलीच्या शतकाची वाट पाहत होते. त्याने चाहत्यांची इच्छा पुर्ण करत टी २० क्रिकेटमधील पहिले शतक ठोकले आहे. त्याने ६१ चेंडूमध्ये १२२ धावांची शतकीय खेळी केली. त्यामध्ये त्याने १२ चौकार आणि ६ षटकार मारले.
विराट कोहलीमुळेच भारताला मोठा स्कोर उभारणे शक्य झाले. त्यानंतर भारताकडून भुवनेश्वर कुमारने सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांमध्ये फक्त ४ धावा दिल्या आणि अफगाणिस्तानच्या अर्ध्या संघाला तंबुत पाठवले. भुवनेश्वर कुमारने ४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.
आशिया कपमध्ये आज भारतविरुद्ध अफगाणिस्तान असा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना विराट आणि केएल राहुलने भारतीय संघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली. गेल्या काही सामन्यात फ्लॉप ठरलेल्या केएल राहुलने या सामन्यात मोठी खेळी खेळली. त्याने ४१ चेंडूत ६२ धावा केल्या. तसेच जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने १२२ धावांची नाबाद खेळी केली.
हा भारतीय संघाचा सुपर ४ मधील शेवटचा सामना होता. हा सामना भारतीय संघाने १०१ धावांनी जिंकला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत २१२ धावा केल्या होत्या. तसेच २१३ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानला दिले होते. एवढा मोठा धावांचा डोंगर पार करणे अफगानिस्तानला अवघड होते.
अशात अफगाणिस्तानचे फलंदाज या सामन्यात पुर्णपणे फ्लॉप ठरले. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना २० षटकांमध्ये फक्त १११ धावाच करता आल्या. यावेळी त्यांनी ८ विकेट्स सुद्धा गमावल्या. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना १०१ धावांनी जिंकला आहे.
तसेच अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि दीपक हुड्डा या तिघांनी एक-एक विकेट घेतल्या. अफगाणिस्तानमध्ये फक्त इब्राहिम झद्रन याने चांगली कामगिरी केली. त्याने ५९ चेंडूत ६४ धावा केल्या. या सामन्यात भारतीय संघाची धुरा केएल राहुल सांभाळत होता. रोहित शर्माला या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. तसेच युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याही प्लेईंग ११ मध्ये नव्हते.
महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray: ठाकरेंना मोठा धक्का; दहा वर्षे आमदार असलेला कोकणातील बडा नेता शिंदे गटात सामील
Amit Shah : अमित शहांचा सुरक्षा घेरा तोडून त्यांच्या मागेपुढे करणारा धुळ्याचा हेमंत पवार कोण? पोलिसांनी केलीये अटक
Navinit Rana : नवनीत राणांनी केलेला लव्ह जिहादचा आरोप निघाला खोटा, मुलीच्या जबाबाने राणा पडल्या तोंडघशी
Yakub Memon : याकूबच्या थडग्यावरील सजावटीमागे कोणाचा हात? स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्याने केला मोठा खुलासा





