१८ दिवस फक्त पाणी प्यायलो, एका पोलिसाचा जीव वाचवला; सदावर्तेंनी सांगितला जेलचा हैराण करणारा अनुभव

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक हल्ल्या प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी अखेर त्यांना जामीन मिळाला आहे. तब्बल १८ दिवसानंतर सदावर्ते यांची जेलमधून सुटला झाली आहे.  (advocate gunratna sadavarte share their jail experience)

आता जेलमध्ये वेळ घालवल्यांतर सदावर्ते यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी आपण जेलमध्ये १८ दिवस काय-काय केले याबाबत सांगितले आहे. जेलमध्ये १८ दिवस फक्त पाणी प्यायलो, तिथे अनेकांना योगा शिकवला. तसेच हृदयविकाराचा झटका आलेल्या एका पोलिस शिपायाचा जीव वाचवला. तुरुंगातही अनेक चांगली कामे केली, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

गुणरत्न सदावर्ते तब्बल १८ दिवसानंतर बाहेर आले आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ते आर्थर रोड जेलमधून बाहेर आले आहे. जेलमधून बाहेर पडताच ते पुन्हा एकदा जुन्या अंदाजात दिसून आले. जेलमधील १८ दिवसांचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.

कितीही मुस्कटदाबी केली तरी हिंदूस्तानी कधीही त्याच्या ध्येयापासून मागे हटत नाही. १३ वर्षांच्या माझ्या झेनने (सदावर्तेंची मुलगी) आतापर्यंतच्या न्यायालयीन प्रकरणातील वेगवेगळे मुद्दे काढून देण्याचे काम केले आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

तसेच १८ दिवस कसे गेले हे सांगायचं झालं, तर मी तुरुंगात केवळ पाणी प्यायलो. जिथे मी पहिल्यांचा पोलिस कस्टडीत होतो, तिथे मी एका पोलिस शिपायाचा जीव वाचवू शकलो. त्या शिपायाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी कोणत्याही शिपायाला फर्स्ट एड माहित नव्हतं. तेव्हा मला तुरुंगातून बाहेर काढले आणि मी त्याचा जीव वाचवला होता, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

मी ज्या ज्या तुरुंगांमध्ये गेलो, तिथे मी योगाचं शिक्षण दिलं. अध्यात्मिक भाषणे केली. तुम्ही कुठेही गेला तरी काही फरक नाही पडत. तुम्ही कुठेही राहून चांगलं काम करु शकतात. हेही मी १८ दिवसांत अनुभवले आहे, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

तसेच मी ठरवलं होतं की, सरकारला जे करायचं ते करु दे, आपण आपलं तत्व सोडायचं नाही. मी १८ दिवसांपासून फक्त पाणी पितोय, तरी कष्टकऱ्यांचा हा आवाज शाबूत आहे. येणाऱ्या काळात मी कष्टकऱ्यांसाठी नेहमी लढत राहीन. हे माझ्या कुटुंबाचं वचन आहे. जीव गेला तरी हे वचन मोडणार नाही, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
२४ तास एसी, कूलर, पंखे चालवत आहात? ‘या’ खास Tricks वापरा आणि बिलाची रक्कम अर्ध्यावर आणा!
..अन् उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी स्वत:हून लाऊडस्पीकर उतरवले; वाचा नेमकं काय घडलं
शिवाजी महाराजांविषयी सखोल अभ्यास करून त्यावर अमित शाह यांनी पुस्तक लिहिले- देवेंद्र फडणवीस