Share

पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती झाली उघड, सदावर्तेंच्या पत्नी फरार

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी ११० कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (advocate allegation on sadavarte and his wife)

याप्रकरणी सोमवारी न्यायालयाने बुधवारपर्यंत गुणरत्न सदावर्तेंना पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता आज त्यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी विशेष सरकारी वकील यांनी धक्कादायक खुलासे केले आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याआधी गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या टेरेसवर तीन जणांमध्ये मिटींग झाली होती. या मिटींगमध्ये गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील आणि नागपूरची एक व्यक्ती होती, असा धक्कादायक खुलासा वकीलांनी केला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या टेरेसवर ७ एप्रिल २०२२ ला रात्री ११ ते अडीच वाजेच्या दरम्यान एक मिटींग झाली होती. यावेळी सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील, अभिषेक पाटील आणि नागपूरची एक व्यक्ती होती. सध्या याप्रकरणी सुनावणी सुरु असताना सदावर्तेंच्या पत्नी फरार आहे. त्यामुळे जयश्री पाटील यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं स्पष्ट होत आहे, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले आहे.

नागपूरची व्यक्ती मुंबईत होती. आंदोलनाच्या ठिकाणी होती. ज्यादिवशी आंदोलन झाले ते सर्व आंदोलन नागपूरची व्यक्ती हँडल करत होती. नागपूरच्या व्यक्तीने अभिषेक पाटील याला फोन केला आणि सिल्वर ओक जवळील गार्डनमध्ये लोकांना यायला लावले होते, असा दावा प्रदीप घरत यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे नागपूरच्या व्यक्तीला अभिषेक पाटीलने नंतर फोन केला आणि लोकं गार्डनमध्ये जमा झाली. त्यानंतर नागपूरच्या व्यक्तीने मेसेज केला की पत्रकारांना पाठवा. अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी हे हल्ल्याआधी त्या नागपूरच्या व्यक्तीला समोरा समोर भेटले, असेही वकीलांनी म्हटले आहे.

तसेच कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्तेंनी केलेली रक्कम आंदोलनासाठी खर्च केली गेली नाही. विशेष म्हणजे सदावर्तेंना बाहेरुन फंडींग मिळत होती. तसेच २ कोटी रुपये जे जमा झालेले होते, ते सर्व पैसे जयश्री पाटील यांना देण्यात आले. पैसे कोणी दिले, कसे दिले याची सर्व नोंद एका वहीत करण्यात आली होती. हे प्रकरण आता मोठ्या आर्थिक घोटाळ्याकडे वळत आहे, असेही प्रदीप घरत यांनी म्हटले आहे.

आंदोलनकर्त्यांमधील ११ जण मद्य प्यायलेले होते. त्यांना मद्य कोणी पाजले याचा शोध घ्यायचा आहे. तसेच मी पैसे न घेता ही लोकसेवा करत आहे, असं सदावर्ते बोलत होते आणि मग जर पैसे गोळा केले असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे असेल, तर एक वकील म्हणून त्यांनी आपल्या अलिशांचा विश्वासघात केलाय, असेही वकील प्रदीप घरत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांना नास्तिक म्हणणाऱ्या राज ठाकरेंना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलं उत्तर; मंदिरातील फोटो व्हायरल
युक्रेननंतर फिनलॅंडवर रशिया करणार आक्रमण, ‘या’ कारणामुळे संतापले पुतिन, पाठवले रशियन सैन्य
३०० रुपयांच्या भंगारातील सायकलला बनवले सौर सायकल, चालवायला एक रुपयाही नाही खर्च

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now