गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा निवडणूकीची चांगलीच चर्चा रंगली होती. राज्यसभेच्या निवडणूकीत सहा जागा असताना भाजपने ३, शिवसेनेने २ तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक-एक उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे निवडणूकीत सहाव्या जागेसाठी भाजप-शिवसेना यांच्या चुरस पाहायला भेटणार आहे.
दरवेळी बिनविरोध होणारी राज्यसभा निवडणूक यावेळी मात्र चुरशीच्या लढतीत होणार आहे. त्यामुळे एका आमदाराचं मत सुद्धा यावेळी निकाल बदलवणारं ठरु शकतं. आज म्हणजेच १० तारखेला राज्यसभेसाठी आमदार मतदान करताना दिसून येत आहे. आता सर्व आमदारांचे मतदान झाले आहे.
अशात कोणत्याही आमदाराचं मत अवैध ठरणार नाही यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यासाठी निवडणुकीबाबचे प्रशिक्षणही पक्षांच्यावतीने ठेवण्यात आले होते. पण आज शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचेचे मत अवैध ठरता ठरता राहिले आहे.
आदित्य ठाकरे यांचे मत अवैध ठरले असते तर पक्षावरच नामुष्की ओढावली गेली असती. पण वेळीच झालेला गोंधळ लक्षात आल्याने आदित्य ठाकरेंना योग्य पद्धतीने मतदान करता आले आहे. आज सकाळीच आदित्य ठाकरे राज्यसभेच्या निवडणूकीचे मतदान करण्यासाठी ते विधानभवनात पोहोचले होते.
जेव्हा आदित्य ठाकरे मतदान करण्यासाठी आत गेले, तेव्हा असे लक्षात आले की त्यांच्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्काच नाहीये. त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंची ती मतपत्रिका बाजूला ठेवली आणि निवडणूक आयोगाचा शिक्का असलेली मतपत्रिका दिली.
त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपलं मत नोंदवलं आणि ते विधानभवनातून बाहेर पडले. आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगाचा शिक्का नसलेल्या मतपत्रिकेवर आपलं मत नोंदवलं असतं. तर ते बाद ठरलं असतं. कारण मतमोजणीच्या वेळी त्यावर शिक्का नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला अवैध ठरवलं असतं. आता तिथं निवडणूक आयोगाचा शिक्का नसलेली मतपत्रिका कोणी ठेवली याचीही चौकशी केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
..तेव्हा अमिषा पटेलला आईने कानाखाली लावून घरातून दिले होते हाकलून, ‘हे’ होते कारण
पंकजांना डावलल्यामुळे मुंडे समर्थकांचे बंड; म्हणाले, चंद्रकांत पाटलांच्या तोंडाला काळं फासणार
मैने प्यार कियाच्या सेटवर घमंडी सलमान लक्ष्याशी फटकून रहायचा; मग लक्ष्याने त्याची अशी जिरवली की..