धोका मित्रपक्षाने दिला तर समजू शकतो पण…, आदित्य ठाकरे जिल्हाप्रमुखांना काय काय म्हणाले?

आदित्य ठाकरेंनी शिवसेना जिल्हाप्रमुखांशी चर्चा केली. त्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सत्ता येते, जाते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसाठी काम केले आहे. आम्हाला अनेक जणांचे फोन येत आहेत, राज्यातील जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे.

आपल्याला सहानभूती नको आहे, पुन्हा संघर्ष करू आणि जिंकू असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत असं आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी केलेल्या चर्चेत सांगितलं. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, कुटुंबप्रमुखाला धोका देता त्याचे वाईट वाटते आहे. अनेकांना सत्तेचा मोह मात्र आम्हाला तो मोह झाला नाही.

सत्ता तीन महिने राहुद्या असं म्हणत होते. मात्र बॅगा भरायला सांगताच आम्ही त्वरित मातोश्रीला आलो. धोका मित्रपक्षाने दिला तर समजू शकलो असतो पण धोका कोणी दिला? ज्यांना तिकीट दिलं मोठं केलं, त्यांनीच उद्धव ठाकरेंना धोका दिला, याचं वाईट वाटतंय. २५ वर्षे विरोधात असलेल्या मित्रपक्षांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली. आपल्याला कोणाचीच सहानभुती नकोय.

कोविड वाढला, शस्त्रक्रिया झाली, तरी मुख्यमंत्री सहकार्य मदत करत होते. राज्यातील सर्व जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आहे. वर्षा सोडताना सामान्यांच्या डोळ्यात पाणी होते, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले की, धोका देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना त्यांच्या मुलावरुनही सुनावले आहे. तुम्हाला कॅबिनेट मंत्री केलं, तुमच्या मुलाला खासदारकी दिली आणि माझ्या मुलाला मी काही दिलं तरी तुम्हाला अयोग्य वाटतंय, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच मी आताही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. तसेच त्यांनी शिवसेनाप्रमुख पदाबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. जर तुम्हाला वाटत असेल, तर मी पक्षप्रमुखाचाही राजीनामा द्यायला तयार आहे. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे हे विसरुन जा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
पुजारा, पंत आणि बुमराह भारताविरुद्धच समोरच्या संघाकडून मॅच खेळणार; ‘हे’ आहे कारण
एकेकाळी चालवायचे रिक्षा, डोळ्यादेखत मुलांचा बुडून मृत्यु, असा आहे एकनाथ शिंदेंचा जीवनप्रवास
राहुल जैन नाव सांगू २ वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिला अब्दुल वसीम, लग्नाचं वचन देऊन केला बलात्कार
परत आलात तर ठीक नाहीतर.., उद्धव ठाकरेंचा बंडखोर आमदारांना २४ तासांचा अल्टिमेटम