Aditya thackeray shiv sanwad yatra | सध्या शिवसेनेची शिव संवाद यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे. आदित्य ठाकरे पुर्ण राज्य पिंजुन काढत आहेत. पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करण्यासाठी ते महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात फिरत आहेत. शनिवारी औरंगाबादमध्ये त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. त्यावेळी त्यांचं मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलं.
हजारोंची गर्दी तेथे जमली होती. त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. या यात्रेवेळी त्यांनी वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, एलोरा या ठिकाणी भेट दिली. या यात्रेसाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या नावाचा जयघोषही करण्यात आला.
आदित्य ठाकरेंना पाहण्यासाठी इमारतींच्या वरती आणि पायऱ्यांवरही लोकांनी गर्दी केली होती. त्यांनी औरंगाबादमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. तसेच बंडखोरी करणाऱ्या आणि शिंदे गटात सामिल होणाऱ्या आमदार संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील बिडकीनमध्येही आदित्य ठाकरेंचा रोड शो झाला.
यावेळी ते म्हणाले की, शैतानी महत्वाकांक्षेतून निर्माण झालेलं हे सरकार घटनाबाह्य तसंच बेकायदेशीर आहे. ते तात्पुरतं सरकार असून लवकरच पडणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. त्यांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली.
दरम्यान, एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील बिडकीन येथे आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. यावेळी बिडकीन परिसरात शिवसैनिकांमध्ये कमालीचे चैतन्य संचारल्याचे दिसले. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेतील ही सर्वात मोठी गर्दी असल्याची चर्चा आहे.
या गर्दीकडे पाहता, ही बाब बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांची चिंता वाढवण्याची आहे. आदित्य ठाकरे हे शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये होते. त्यानंतर संध्याकाळी ते औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले होते. औरंगाबादेत येताना वैजापूर, खुलताबाद परिसरात त्यांचे जंगी स्वागत झाले.
आदित्य ठाकरे यांच्या बिडकीनमधील रोड शो वेळी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी होती. त्यांना पाहण्यासाठी इमारतीच्या गच्चीवरही लोक जमले होते. एकूण आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसला. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड चैतन्य संचारले होते.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला आणि भाषणांना मिळणारा प्रतिसाद असाच वाढत राहिला तर शिंदे गटासाठी ही नक्कीच चिंतेची बाब ठरू शकते. आता आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेला पुन्हा उभारी देऊ शकणार का? पक्षाची होणारी गळती यामुळे थांबणार का हे पाहावं लागेल.
महत्वाच्या बातम्या
भाजप विरूद्ध शिंदे गटात जुंपली; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला शिंदे गटाकडून जोरदार प्रत्यूत्तर
Hot Summer: कडक उन्हामुळे ‘येथे’ ट्रेन चालवणेही झालंय कठीण, रेल्वेचे रुळही वितळले, वाचून हादराल
प्रथमच भारतीय क्रिकेटपटूला मिळाला विदेशात असा सन्मान, ‘या’ स्टेडियमला देणार गावसकरांचे नाव
मविआची साथ सोडून शिवसेना स्वबळावर लढणार? ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचे मोठे वक्तव्य