Share

गद्दारांना माफी नाही! बंडखोर आमदारांना आदित्य ठाकरेंनी दिले ‘हे’ दोन पर्याय

शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांचे नेतृत्व करताना दिसून येत आहे. सध्या त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार असून ते सर्व आसामच्या गुवाहटीमध्ये आहे. (aditya thackeray share 2 options to mla)

महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी शिवसेना नेत्यांचे प्रयत्न सुरु आहे. असे असताना आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंसोबत गेलेले १५ ते १६ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनाही सुनावले आहे. फुटीरवाद्यांना महाराष्ट्र कदापी माफ करणार नाही. ज्यांना जायचे त्यांनी जा. त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहे. राज्याच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडे जे खातं असतं ते एकनाथ शिंदे यांना दिलं होतं. मग त्यांना कमी काय पडलं? असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

२० मे रोजी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतरही त्यांनी २० जूनला बंड केले. या बंडखोरांना आता विधानसभेची पायरी कधी चढून देणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आसाममध्ये एकीकडे पूर आला आहे. तिथे लोकांना संरक्षण द्यायला हवे. पण हे संरक्षण बंडखोरांना दिलं जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायची त्यांची लायकी नाही. ती लायकी तुमची असती तर तुम्ही बंड करुन सुरतला गेला असता का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

खरोखर त्यांच्यात लाज, स्वाभिमान असता तर त्यांनी इथं येऊन बंड केलं असतं. महाराष्ट्रात लपायची हिंमत नाही, म्हणून सुरतला पळाले, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे. तसेच बंडखोरांपुढे आता दोनच पर्याय उरलेत एकतर प्रहार पक्षात विलीन व्हा नाही तर भाजपमध्ये जा. तुमच्या हिंमत असेल, तर राजीनामे द्या आणि पुन्हा निवडून दाखवा, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल म्हणून शिंदे गटातील २० ते २५ आमदार नाराज, मुंबईत परत येण्याची शक्यता
अखेर बंडखोरांसोबत बैठक घेत फडणवीसांनी टाकला ‘हा’ डाव; मविआचा खेळ खल्लास
”तुमच्यात धमक असेल तर राजीनामे द्या अन् आपआपल्या मतदारसंघातून निवडून या”

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now