Share

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देणार – आदित्य ठाकरे

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर एसटी कामगारांनी अचानक धरणे आंदोलन केले. यावेळी एसटी कामगारांनी सिल्व्हर ओकच्या परिसराची तोडफोड करून आंदोलन सुरू केले. इतकेच नाही, तर निवासस्थानाला चप्पलाही फेकून मारल्या. (aditya thackeray on silver oak incident)

शरद पवारांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांनाही धक्का बसला. शरद पवारांच्या निवासस्थानी आंदोलन होत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही घराबाहेर पोहचले होते.

या घटनेमुळे राजकीत वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. असे असतानाच आता पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेची चौकशी होईल आणि कठोर कारवाई केली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचं राजकारण कधीही इतकं घाणेरडं झालं नव्हतं. असं कुणाच्याही घरावर आंदोलन झालं नव्हतं. या संपूर्ण प्रकाराची कसून चौकशी केली जाईल. तसेच जे यात दोषी आढळून येतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा मोर्चा अचानक सिल्वर ओककडे वळवला. तसेच त्यांनी तिथेच आंदोलन करत दगडफेक, चप्पलफेक केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर महाविकास आघाडीचे अनेक मंत्री सिल्वर ओकवर दाखल झाले होते. त्यात आदित्य ठाकरे यांनीही सिल्वर ओकला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. शरद पवारांच्या घरी आंदोलन झाल्याचे समजताच राष्ट्रवादीचे मुंबईचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांचे कार्यकर्तेही सोबत होते. त्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. कामगारांनी सदावर्ते यांच्या सांगण्यावरुनच हे आंदोलन केले. हिंमत असेल, तर त्यांनी इथं येऊन दाखवावं आम्ही त्यांना सोडणार नाही, असे नरेंद्र राणा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
पवार आजपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उतरले…; निवासस्थानावर हल्ला झाल्यानंतर धनंजय मुंडेची पहिली प्रतिक्रिया
शरद पवारांच्या घरावर हल्ला हा लोकशाहीचा पहिला खून; जितेंद्र आव्हाड भडकले
१२ तारखेला १२ वाजता बारामतीत काय घडणार? संतप्त कर्मचाऱ्यांनी सांगितला प्लॅन, सरकारच्या अडचणी वाढणार

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now