Share

तुम्हाला पाडलं नाही, तर माझं नाव आदित्य नाही; जाहीरसभेत आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

aditya thackeray

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे ते वाचवण्यासाठी शिवसेना नेत्यांचे प्रयत्न सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. (aditya thackeray on shivsena mla)

आता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे मेळावे घेताना दिसून येत आहे. आता कर्जत येथील एका मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना सुनावले आहे.

दगाफटका करणारे, पळून जाणारे जिंकत नाही. महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही. आम्हाला पुर्ण विश्वास आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच तुम्हाला पाडलं नाही तर माझं नाव आदित्य नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.

बंडखोर आमदार खोटं बोलत आहे. शिवसेना नावाचा दुसरा गट बनूच शकत नाही. बंडखोर आमदारांकडे दोनच पर्याय आहे. ते म्हणजे भाजपात किंवा मनसेत विलीन व्हायचा. या फुटीरवाद्यांना मी विधानसभेची पायरी चढू देणार नाही. मी यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारेन की आम्ही यांच्यासाठी काय कमी केलं? असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी देताना न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने उपसभापती अजय चौधरी, सुनील प्रभू आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाच दिवसांत या नोटीसला उत्तर द्यावे, असे म्हटले आहे.

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जूलै रोजी होणार आहे. तसेच आमदारांनी १२ जूलैपर्यंत आपली बाजू मांडावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पण तोपर्यंत शिवसेनेला बंडखोर आमदारांवर कारवाई करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
रुपाली पाटलांची मनसे इच्छा; म्हणाल्या, ‘दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे, आम्ही बाळासाहेबांची पोरं…’
प्रसिद्ध अभिनेत्री करतेय पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा; पाय चेपण्यापासून तर…
‘शिवसैनिकांची अवस्था भिकाऱ्यासारखी, बाहेरच्यांना गुलाबजाम अन् आम्हाला डाळभात पण नाही’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now