मराठी सिनेसृष्टीत अनेक जोड्या प्रसिद्ध आहे, त्यांच्या नात्यांमुळे त्या चर्चेतही असतात. काही वेळा त्यांच्यात झालेल्या वादामुळेही त्या चर्चेत येतात. त्यातलीच एक जोडी म्हणजे अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे. (adinatha kothare talk about urmila)
आदिनाथ आणि उर्मिला हे अनेकदा चर्चेत येत असतात.चाहत्यांना या दोघांची जोडी खुपच आवडत असून त्यांची फॅन फॉलोविंग सुद्धा प्रचंड आहे. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. पण आता याबाबत आदीनाथनेच खुलासा केला आहे.
उर्मिला आणि आदिनाथबद्दल सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. इतकंच नाहीतर उर्मिला आणि आदिनाथमध्ये गेल्या काही महिन्यांपासून काहीतरी बिनलंय असे म्हटले आहे. तसेच ते दोघे वेगवेगळ्या फ्लॅटमध्येही राहत असल्याचे म्हटले जात आहे.
उर्मिला आणि आदिनाथ हे कित्येक दिवसांपासून एकत्र दिसलेले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. अशात आदिनाथने स्वत:च या गोष्टीचा खुलासा केला आहे. उर्मिला आणि माझ्यात सर्वकाही छान सुरु आहे. आम्ही एकमेकांसोबत खुश आहोत. माझ्या आणि उर्मिलाबद्दल सुरु असलेल्या अफवांवर मी लक्ष देत नाही, असे आदिनाथने म्हटले आहे.
दरम्यान, उर्मिला आणि आदिनाथची ओळख एका चित्रपटाच्या माध्यमातून झाली होती. तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. शुभमंगल सावधान या चित्रपटाच्या माध्यमातून उर्मिलाने पहिल्यांदाच मुख्य नायिकेची भूमिका निभावली होती. तसेच हा चित्रपट कोठारे प्रोडक्शनचा होता.
आदिनाथ त्यावेळी चित्रपटाचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. पण त्यांची भेट सेटवर नाही, तर घरी झाली होती. पहिल्यांदा भेट झाली तेव्हाच आपण तिच्या प्रेमात पडलो होतो, असे आदिनाथने म्हटले होते. २० डिसेंबर २०११ मध्ये त्यांनी लग्न केले होते.
महत्वाच्या बातम्या-
अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने कॅमेऱ्यासमोरच काढले सगळे कपडे, व्हिडीओने उडाली खळबळ; पहा व्हिडीओ
आनंद दिघेंच्या मृत्यूचा सीन न पाहताच मुख्यमंत्री चित्रपटगृहाबाहेर; जाणून घ्या नेमकं काय घडलं…
सत्ता आल्यानंतर काँग्रेस घालणार EVM वर बंदी; काँग्रेसचा मोठा निर्णय