आदिनाथ कोठारे मराठी चित्रपटसृष्टीत एक नावाजलेलं नाव आहे. आदिनाथने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनाच्या जोरावर त्याने त्याचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आदिनाथ कोठारे फक्त अभिनेताच नाही, तर एक चांगला दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. (adinath kothare talk about nepotism)
सध्या आदिनाथ हा त्याच्या चंद्रमुखी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चंद्रमुखी चित्रपटात त्याने दौलतराव देशमाने ही चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता नुकतीच त्याने एक मुलाखत दिली आहे. त्यावेळी त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक अनुभव शेअर केले आहे.
स्टार किड्स आणि घराणेशाहीचे आरोप आदिनाथ कोठारेवर होताना दिसतात. आता त्यावरच आदिनाथ कोठारेने भाष्य केले आहे. प्रत्येक क्षेत्रातील स्टार किड्सला बघताना लोकांच्या मनात एक वेगळाच विचार असतो, माझ्या नावाच्या मध्यभागी महेश कोठारेंचे नाव असल्यामुळे काही लोक मला खूप वेगळ्या नजरेने बघतात, असे आदिनाथने मुलाखतीत म्हटले आहे.
हा तर स्टार किड्स आहे, त्याला काय कमी आहे. त्याला सर्व आयतं मिळत असणार. त्याला त्याच्या आईवडिलांच्या क्षेत्रात करीअर करायचे असेल, तर त्याला अधिक सोपे होईल. मला मनोरंजन क्षेत्रात काम करताना कोणतीही अडचण येणार नाही, असेही काही लोक बोलयचे, असे आदिनाथने म्हटले आहे.
पण मी एका मोठ्या अभिनेत्याचा, दिग्दर्शकाचा, निर्मात्याचा मुलगा आहे, असे मला कुटुंबाने कधीही जाणवू दिले नाही. माझी शाळा पुर्ण होईपर्यंत मला महेश कोठारे यांच्या प्रसिद्धीचा गर्व येणार नाही, याची पुरेपुर काळजी आईने घेतली होती, असा खुलासा आदिनाथने केला आहे.
मी कॉलेजला जातानाही ट्रेनने प्रवास केला आहे. माझा छकुला या चित्रपटात मी बालकलाकार म्हणून काम केले होते. पण तरीही मला घरातून स्टार किड्सची वागणूक मिळाली पाहिजे असे मला वाटलं नाही. कारण माझ्या घरातून मला हे वातावरण मिळाले, असेही आदिनाथने म्हटले आहे.
आदिनाथ हा महेश कोठारे यांचा मुलगा असल्यामुळे साहजिकच त्याच्या घरी सिनेसृष्टीतील कलाकारांचा येणे-जाणे असायचे. यामुळे माझ्या मनात सिनेसृष्टीबद्दल आवड निर्माण झाली. पण माझ्यावर कुटुंबाने कधीच बंधने घातली नाही. मला ज्या क्षेत्रात करीअर करायचे आहे, त्याच्यात करीअर करण्याची मूभा मला देण्यात आली होती, असे आदिनाथने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
यासिन मलिकला जन्मठेप दिल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट; शाहिद आफ्रिकीने ओकली गरळ
VIDEO: सायकल सेकंड हँड, पण आनंद फर्स्ट क्लास; बाप-लेकाचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील
संघात निवड न झाल्यामुळे शिखर धवनला वडिलांनी सर्वांसमोर लाथा बुक्यांनी चोपले; पहा व्हिडिओ