Share

अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअरने घातला धुमाकूळ, गुंतवणूकदारांना दिला ८६,६८० टक्के परतावा

share markert

शेअर बाजारातून पैसे मिळवण्यासाठी गुंतवणूकदाराने संयम बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. शेअर्सची त्वरित खरेदी-विक्री करून मोठा नफा मिळवता येत नाही. जे गुंतवणूकदार शेअर्स विकत घेतात आणि दीर्घ मुदतीसाठी त्यांच्याकडे ठेवतात, त्यांनाच मोठा फायदा होतो. (adani group transmission share)

आता अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा झाल्याची माहिती समोर आली आहे. ७ वर्षांपूर्वी अदानी ट्रान्समिशनचा शेअरची किंमत २७.६० रुपये होती. ती आता २,४२० रुपये झाली आहे. अशाप्रकारे, ७ वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना ८६,६८० टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्ये गेल्या एका महिन्यात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे हा शेअर २,०३२ रुपयांवरून २,४२० रुपयांवर पोहोचला आहे. हा स्टॉक गेल्या ६ महिन्यांत ५५ टक्के वाढला आहे, तो १,५७८ रुपयांच्या पातळीवरून २,४२० रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या वर्षभरात हा शेअर १९० टक्क्यांनी वाढला आहे. जर आपण गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये ३,६७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी या शेअरची किंमत फक्त ८१.३५ रुपये होती. तर सात वर्षांत हा स्टॉक ८७.७ पट वाढला आहे. ३१ मार्च २०१५ रोजी या शेअरची किंमत NSE वर २७.६० रुपये होती. तर २४ मार्च २०२२ रोजी, हा स्टॉक NSE वर २,४२० रुपयांवर बंद झाला.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी अदानी ट्रान्समिशन स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर ते १ लाख रुपये आता १.२० लाख रुपये झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने ६ महिन्यांपूर्वी त्यात एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्याची गुंतवणूक आता १.५५ लाख रुपयांची झाली असेल.

एका वर्षापूर्वी गुंतवलेले १ लाख रुपये आतापर्यंत २.९० लाख रुपये आणि तर पाच वर्षांपूर्वी गुंतवलेले १ लाख रुपये आता ३७.७० लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे सात वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर ते १ लाख रुपये आता ८७.७० लाख रुपये झाले असते.

महत्वाच्या बातम्या-
बॉलिवूडच्या फेमस जोडीत आला दुरावा; लग्नाची बोलणी सुरू असतानाच श्रद्धा कपूरचा झाला ब्रेकअप
भारत घडवणार मोबाईल क्रांती; चीनी-व्हिएतनाम नाही, आता भारताने बनवलेले मोबाईल वापरणार लोकं
‘बाहुबली’ चित्रपटासाठी प्रवीण तरडेच्या पत्नीनं केलं खास काम; खासदार अमोल कोल्हेही टॅलेंटवर झाले फिदा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now