Ruchita Jadhav: भाजपचे जुने नेते आणि पुण्याच्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले गिरीश बापट यांचं आज पुण्यात निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेते मंडळींनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मनोरंजन विश्वात देखील त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री रुचिता जाधवने गिरीश बापट यांना सोशल मीडिया पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. रुचिताने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट करताना गिरीश बापट यांच्याबरोबरचा तिचा एक फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
पोस्ट करताना तिने लिहिलेलं की, भाऊ.. तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाली… आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरून शकणार नाही.. वडिलांसारखी तुमची माया आणि शब्बासकीची मला कोण देणार.. तुम्हाला विसरणं शक्य नाही… भावपूर्वक श्रद्धांजली भाऊ, असे म्हणत भावूक पोस्ट शेअर केली.
खासदार गिरीश बापट यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू झाली होती. आमदार खासदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. गिरीश बापट यांनी पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक पाऊले उचलली होती.
पुण्यातील भाजप नेते खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७२ वर्षांचे होते. खासदार गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मल्लिक यांनी दिली आहे.
बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, गिरीश बापट यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. गिरीश बापट दीड वर्षापासून रुग्णालयात होते, त्यांचे आज निधन झाले. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
पुण्यात भीषण अपघात; दारूड्या पिकअप ड्रायव्हरने ८ जनांना चिरडलं, ५ लोकं जागीच
“बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते आम्ही सावंत बंधूंनी करुन दाखवलं”; तानाजी सावंतांचे गर्विष्ठ वक्तव्य
कसब्यात टिळक कुटुंबीयांना उमेदवारी का दिली नाही? अखेर चंद्रकांत पाटलांनी सांगीतले खरे कारण