Rakhi Sawant : बाॅलिवूडमध्ये ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant) होय. अभिनेत्री राखी सावंत नेहमीच तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणारी राखी सावंत पुन्हा एकदा अडचणीत आली आहे.
मुंबई पोलिसांनी राखी सावंतला अटक केली आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने राखी सावंतविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीत राखीवर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
राखीला पोलीसांनी ताब्यात घेतले असून अंधेरी न्यायालयात हजर करणार आहे. शर्लिन चोप्राने स्वतः ट्विटरवर राखी सावंतच्या अटकेविषयी माहिती दिली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजत आहे.
शर्लिन चोप्राने ट्विट केले की ‘ब्रेकिंग न्यूज… राखीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच राखीवर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती दिली. काल राखी सावंतचा
ABA 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.
गेल्या वर्षी शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात भांडण झाले होते.
राखीने मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. 2022 मध्ये, शार्लिन चोप्राने राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती, तिने पत्रकार परिषदेत तिचा अश्लील व्हिडिओ दाखवताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलिसांनी राखी सावंतवर कारवाई केली आहे.
दरम्यान, राखी सावंतने नुकतेच आदिल दुर्राणीशी लग्न केले आहे. तेव्हापासून ती चांगलीच चर्चेत राहिली आहे. आज ती तिची डान्स अकादमी लॉन्च करणार होती, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी तिला अटक केली.
महत्वाच्या बातम्या