Share

Mansi Naik: लग्नाच्या दिड वर्षातच अभिनेत्री मानसी नाईक घेणार घटस्फोट? म्हणाली, “आयुष्यचा बेरंग…

Mansi Naik: ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं’, असं म्हटल जात. पण नवरा बायको म्हटल की वाद हे आलेच. आपण नेहमी पाहतो. नवरा बायको एकमेकांसोबत भांडण करता आणि पुन्हा एकत्र येतात. असच भांडण सध्या मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक हिच्या आयुष्यात घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री मानसी नाईक ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या मराठी गाण्यांमुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. मानसी नाईक तिच्या म्युझिक अल्बम आणि सोशल मीडियावरील तिच्या वावरामुळे सतत चर्चेत येते. तसेच मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. मानसी तिच्या आयुष्यातील अनेक घटना तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकांऊटवर शेअर करत असते.

मानसी नाईक हिने नुकतीच एक सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मानसीची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मानसीने तिच्या पतीसोबत असणारे सोशल मीडियावरील फोटो डिलीट केले आहेत. तसेच तिने तिच्या पतीचे आडनाव देखिल हटवले आहे. त्यामुळे मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार अशी चर्चा सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच मानसी नाईक हिने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिले की, ‘वाईट बातमी- कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही, चांगली बातमी- कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही’ त्यानंतर आता मानसी नाईकची आणखी एक पोस्ट चर्चेत आली असुन सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

अभिनेत्री मानसीने तिच्या पाळीव मांजरीसोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे‌. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहीले की, “समझदारी जिंदगी को बेरंग कर देती है… धन्यवाद.” तसेच तिने तिने #Universe हा हॅशटॅग देखील वापरला आहे. त्याच वेळी या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘प्रेम में तोहरे…’ हे ‘बेगम जान’ चित्रपटातील गाणं वाजताना ऐकू येत आहे.

दरम्यान, अभिनेत्री मानसी आणि प्रदीप खरेरा अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते. १९ जानेवारी २०२१ला ते दोघे विवाह बंधनात अडकले. या दोघांचा विवाह सोहळा माटात पार पडला. तर हळद, मेहंदी आणि लग्न असा तीन दिवसांचा कार्यक्रम अगदी जल्लोषात साजरा करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-
hardik pandya : सुर्यासारख्या हिऱ्याची पारख खूप आधी व्हायला पाहीजे होती पण त्यांनी मात्र..; कोहली-शास्रींना पांड्याने झापले
pratapgad : आता महाराजांच्या गडावरही अतिक्रमन; प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाशिवाय आणखी दोन कबरी आढळल्या
Health : ‘हे’ आहेत पाया सुप पिण्याचे आरोग्यदायी फायदे; वाचून चकीत व्हाल

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now