प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. मे महिन्यांत तिने ती पोस्ट शेअर केली होती, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. ( actress ketki chitale on sharad pawar)
आता केतकी चितळे काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आली आहे. यावेळी तिने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. तुरुंगात असताना तिच्यावर अत्याचार झाले असा आरोप तिने केला आहे. त्यानंतर आता तिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिने शरद पवारांबद्दलच्या पोस्टबद्दल भाष्य केलं आहे.
फक्त फेसबूकवर एक पोस्ट कॉपी पेस्ट केल्याने मला तुरुंगात टाकलं, असे केतकीने मुलाखतीमध्ये म्हटले आहे. पोस्ट केल्यानंतर काही वेळातच पोलिस माझ्या दारात उभी होती. त्यांनी मला ताब्यात घेतलं आणि पोलिस स्टेशनमध्ये नेलं, असे केतकीने म्हटले आहे.
त्या सर्व गोंधळामध्ये २० ते २५ जणांनी माझी छेड काढली होती. माझ्यावर हल्ला केला होता. मला मारलं होतं. शाईच्या नावाखाली माझ्यावर विषारी रंग सुद्धा फेकले गेले. फक्त माझ्यावरच नाही, तर पोलिसांवरही लोकांनी हल्ले केले होते, असे केतकीने म्हटले आहे.
मी एक पोस्ट शेअर केली होती आणि २२ ठिकाणी माझ्याविरोधात गुन्हे दाखल झाले. या २२ पैकी केवळ एका प्रकारणात मला जामीन मिळाला आहे. अजून २१ प्रकऱणं बाकी आहे, असे केतकी चितळेने दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. तसेच तिने शरद पवारांवरही भाष्य केलं आहे.
मी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत पोस्ट केली होती. ते लोकांनी एका वेगळ्या अर्थाने घेतलं, तर मी त्यात काही करु शकत नाही. मी फक्त यमक जुळवून घेतलेल्या पोस्टसाठी तुरुंगात होते. पवार म्हणजे धर्म नाहीत, असेही केतकीने यावेळी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर मेहेरबानी; अपात्रतेसाठीच्या यादीतून आदित्य ठाकरेंना वगळलं
मी शरद पवारांना नव्हे, पण ‘या’ दोन नेत्यांना घाबरतो; शहाजी बापूंनी केला खुलासा, वाचा काय म्हणाले?
VIDEO: साऊथच्या ‘या’ अभिनेत्याला पत्नीने हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, दिला चपलेचा चोप