Share

लोकप्रिय अभिनेत्रीला पुण्यात अटक, महिला पोलिसाच्या हाताचा चावा घेत केली तिला मारहाण

पुण्यात एका टीव्ही अभिनेत्रीने महिला पोलिसांशी गैरवर्तन केले. महिला पोलिसांशी वाद तर झालाच, पण आरोपी अभिनेत्रीने महिला पोलिसाच्या हाताचा चावाही घेतला. पुणे पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. चौकशीदरम्यान अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले की, तिने पुण्यातील एका मोठ्या हॉटेलमध्ये स्वत:साठी रूम बुक केली होती.

एका वेब सीरिजच्या शूटिंगसाठी ती पुण्यात आली होती. पण हॉटेलमध्ये कोणतीही सोय नव्हती. या कारणावरून अभिनेत्रीने हॉटेलमध्ये गोंधळ घातला आणि तिचे पैसे परत मागितले. महिलेला राग आल्याचे पाहून हॉटेलवाल्यांनी थेट पोलिसांना बोलावले आणि एक महिला पोलिस घटनास्थळी आली.

पुढं घडलं असं की, महिला पोलीस अभिनेत्रीला समजावत राहिल्या, मात्र समजून घेण्याऐवजी महिलेने पोलिसांशी गैरवर्तन केले. परिस्थिती इतकी बिघडली की, अभिनेत्रीने महिला पोलिसाच्या हाताचा चावा घेतला. अभिनेत्रीने ज्या महिला पोलिसांसोबत गैरवर्तन केले ती पुणे पोलिसांच्या दामिनी पथकातील आहे.

परवीन शेख असे त्या महिला पोलिसाचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रीबाबत ती कर्नाटकची रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. पण चित्रपट आणि टीव्ही शोच्या शूटिंगमुळे ती सतत मुंबई-पुण्याच्या दौऱ्यावर असते. त्याचप्रमाणे शुक्रवारीही अभिनेत्री पुण्यात आली होती. मात्र तेथे हॉटेलमध्ये पुरेशी व्यवस्था न मिळाल्याने तिने आपले पैसे परत मागितले.

हॉटेलवाल्यांनी ती मागणी मान्य करण्यास नकार दिला, त्यानंतर दामिनी स्कॉडच्या महिला कॉन्स्टेबल परवीन शेख हे प्रकरण शांत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. पण तिथे २६ वर्षीय अभिनेत्रीची महिला पोलिसांशी जोरदार भांडण झाली. पोलिसांनी आरोप केला आहे की, अभिनेत्रीने महिला पोलिसाच्या हाताचा फक्त चावा घेतला नाही तर तिला मारहाणही केली आहे.

पोलिसांनी आरोपी अभिनेत्रीची ओळख उघड केलेली नाही. दरम्यान, या घटनेची चर्चा पुर्ण पुण्यात रंगली आहे. ते हॉटेल कोणते होते? हे देखील उघड करण्यात आलेले नाही. अभिनेत्री कोण होती हे सांगण्यासही पोलिसांनी नकार दिला आहे. ती अभिनेत्री कोणत्या वेबसिरीजच्या शुटींगसाठी पुण्यात आली होती हेेसुद्धा अदयाप समजलेले नाही.

महत्वाच्या बातम्या
माझ्यावर चालून आले तर ही लोकं त्यांना डसून संपवून टाकतील, एकनाथ शिंदेंचा इशारा
४५ वय ओलांडलेल्या ‘या’ ७ अभिनेत्री लग्नाशिवायही आहेत आनंदी; जगत आहेत मस्त आयुष्य
आंब्याच्या निर्यातीतून मुकेश अंबानींनी कमावला बक्कळ पैसा, तब्बल इतक्या एकरात पसरली आहे त्यांची बाग

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now