मराठीतील सर्वांत मोठं बजेट असलेला ऐतिहासिक चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सर्व ठिकाणी फक्त या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. प्रेक्षक देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतचं ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासने या चित्रपटाचं कौतुक केलं. (actor prabhas appreciate marathi movie senapati hambirrao )
काही दिवसांपुर्वी या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. त्या टीझरला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘बाहुबली’ व ‘साहो’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या अभिनेता प्रभासने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. प्रभासने ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा टीझर पोस्ट करत खास ट्विट केलं.
‘टीझर खूप आवडला. मराठीतील मोठ्या बजेटच्या या ऐतिहासिक चित्रपटाला माझ्याकडून शुभेच्छा’, अशी पोस्ट प्रभासने केली आहे. प्रभासच्या या पोस्टवर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी ‘केलेल्या कामाचं चीज झालं’ म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रवीण तरडेंनी प्रभासचे धन्यवाद मानताना त्याच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे.
‘केलेल्या कामाचं चीज झालं. आज सरसेनापती हंबीररावच्या टीझरचं कौतुक बाहुबली प्रभासने केलं. परवा जवळचे मित्र सुबोध भावे, संजय जाधव, विजु माने, अमित भंडारी, अमेय खोपकर यांनीही केलं होतं. मित्रांनो तुमचेही खूप आभार, असेच पाठीशी राहा. आज प्रभासने दिलेल्या शुभेच्छा पुढच्या प्रवासात महत्वाच्या ठरतील,’ अशा शब्दांत चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हा चित्रपट स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडेंनी केले आहे. आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अनेक लढाया जिंकल्या. या चित्रपटात मराठा साम्राज्य त्यांच्या नजरेतून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी याआधी ‘देऊळबंद’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारखे गाजलेले चित्रपट केले आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट महाराष्ट्र्रात फार लोकप्रिय झाला होता. त्या चित्रपटाचा रिमेक ‘अंतिम’ मागील महिन्यामध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये सलमान खान व आयुष शर्मा प्रमुख भूमिकेत होते.
महत्वाच्या बातम्या
अरे वा! जुन्या स्प्लेंडरला बनवा इलेक्ट्रिक तेही फक्त ‘एवढ्या’ रुपयांत, एका चार्जमध्ये धावणार १५१ किमी
आता मुलीच्या लग्नाची काळजी सोडा, दररोज फक्त १५१ रुपये जमा करा आणि मिळवा ३१ लाख रुपये
गुन्हा दाखल झाल्यावर वानखेडेंचा अनोखा युक्तिवाद; म्हणाले, मी अल्पवयीन होतो, आईने सही करायला सांगितली होती
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! श्रीलंका सिरीजसाठी BCCI देणार मोठे गिफ्ट, वाचून होईल आनंद