शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिंदे गटाला भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. भाजप शिंदे गटातील आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानमध्ये देखील ‘ऑपरेशन लोटस’ सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. यादम्यान एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे.
एकनाथ शिंदेंबाबत एका मराठी अभिनेत्याने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मिडियाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या मयुर उर्फ मयुरेश मुरलीधर कोटकर ३७, रा. बाळकूम पाडा, ठाणे याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली होती.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून त्यावेळी वाद सुरू होता. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट करण्यात आला होता. पालकमंत्र्याविषयी असलेला हा आक्षेपार्ह मजकूर वागळे इस्टेटमधील शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या निदर्शनास आला होता.
नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे याचा वाद काही दिवसांपुर्वी पेटला होता. यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळीही मयुरेश कोटकर त्यांच्या समर्थनार्थ उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
जानकर यांनी याबाबत श्रीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत, कोटकर यांच्याविषयी तक्रार केली होती. त्याप्रकरणी अभिनेता मयुरेश यास पोलिसांनी अटक केली होती. त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यांनंतर त्याला जामीनही मंजूर झाला होता. पोलिसांनी फेसबुकवरून हा आक्षेपार्ह मजकूर डिलीट केला होता.
महत्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदे दिघे साहेबांचा आदर्श सांगतात पण ते कधीच दिघे साहेब होऊ शकत नाही; मनसेने शिंदेंना जागा दाखवली होती
‘त्या’ एका ओव्हरमुळे पालटले नशीब, दीपक हु्ड्डा अन् हार्दिक पांड्याने लिहीली विजयाची गाथा
मिलिंद सोमणने उलगडले बेडरूममधील रहस्य, म्हणाला, अजूनही २६ वर्षांपेक्षा लहान पत्नीला…
एवढ्या मोठ्या बंडखोरीबद्दल तुम्हाला माहितीच नव्हती? राष्ट्रवादीने शिवसेना नेतृत्वावर उपस्थित केले प्रश्न