Share

चित्रपटसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या 30 व्या वर्षी ‘या’ भयानक आजाराने मृत्यु

गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वातून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अशातच शनिवारी मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आसामी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार किशोर दास याचे निधन झाले आहे. (actor kishor das death)

सुप्रसिद्ध आसामी अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या अभिनेत्याने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ही बातमी समोर येताच त्याचे चाहते आणि जवळच्या मित्रांना चांगलाच धक्का बसला आहे. तसेच चित्रपटसृष्टीने एक चांगला अभिनेता गमावल्याचेही म्हटले जात आहे.

शनिवारी, २ जुलै रोजी चेन्नईतील रुग्णालयात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, तो बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. या आजारावर मात करण्यासाठी त्याच्यावर बराच काळ उपचारही सुरू होते, मात्र दीर्घ लढ्यानंतर अखेर शनिवारी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे.

रिपोर्टनुसार, किशोर दास चेन्नईपूर्वी गुवाहाटीमध्ये उपचार घेत होता. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला चेन्नईला रेफर करण्यात आले. या वर्षी मार्चमध्ये अभिनेत्याला चांगल्या उपचारांसाठी चेन्नईला पाठवण्यात आले होते. तसेच कॅन्सर व्यतिरिक्त, किशोरला कोरोना देखील झाला होता. कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असे देखील म्हटले जात आहे.

कॅन्सरच्या काळात कोरोनामुळे त्याची प्रकृती सतत खालावत गेली, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आसामी अभिनेता किशोर दास हा एक प्रसिद्ध कलाकार होता, त्याने आतापर्यंत ३०० अल्बममध्ये काम केले होते. चित्रपट आणि गाण्यांव्यतिरिक्त तो टीव्ही विश्वातील एक प्रसिद्ध कलाकार होता. अनेक लघुपटांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या.

दरम्यान, किशोर दासच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. चाहते आणि अनेक कलाकार त्याला श्रद्घांजली वाहताना दिसून येत आहे. किशोर दासच्या जाण्याने त्याच्या चाहत्यांना खुप दु:ख झाले आहे, तर त्याच्या कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेने पुन्हा उभी फूट! आता आदेश बांदेकरांवर आरोप करत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
PHOTO: रश्मिका मंदान्ना ते नयनतारा, मेकअपशिवाय या 7 साऊथ अभिनेत्रींना ओळखणेही आहे कठीण
नुपूर शर्माला पाठिंबा दिल्यामुळे अमरावतीत भरचौकात व्यवसायिकाची हत्या, राज्यात खळबळ

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now