Share

bjp : मुरजी पटेलांना उमेदवारी माघारी घ्यायला लावल्याने कार्यकर्ते संतापले; भाजपविरोधात घोषणाबाजी

Devendra Fadanvis

bjp : अंधेरी पोट निदवणुकीतून अखेर भाजपने माघार घेतली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पोट निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. अखेर भाजपने माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा विजय झाला आहे.

मात्र असं असलं तरी देखील भाजप श्रेष्ठीच्या निर्णयावर मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणा बाजी केली आहे. पटेल यांनी हायकमांडचा निर्णय मान्य केला असला तरी पटेल यांच्या कार्यकर्त्यांना तो मान्य नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे.

भाजप श्रेष्ठींच्या निर्णयावर संताप व्यक्त करत ‘ये जो हुआ है, वो बहुत गलत हुआ है,’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. याचाच धागा पकडत मुंबईतील एक कार्यकर्त्याने भाजप श्रेष्ठीच्या निर्णयावर ‘बहुत गलत हुआ है’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

यामुळे आता पटेल काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अंधेरीची पोटनिवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं. मुरजी पटेल आज अर्ज मागे घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, 2019 मध्ये पटेल हे लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.  मात्र 2019 मध्ये शिवसेना-भाजप यूती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेकडे गेली. त्यामुळे पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.

मात्र या निवडणुकीत रमेश लटके यांनी पटेल यांचा 16 हजार 965 इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. तर आता पुन्हा एकदा भाजपने पटेल यांना उमेदवारी दिली. मात्र निवडणूक बिनविरोध झाल्याने ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. यामुळे पुन्हा येथे भगवाच फडकला आहे.

महत्वाच्या बातम्या-
Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”
Umran Malik: उमरान मलिकला संघात न घेतल्याने ब्रेट लीने निवडकर्त्यांना लगावला टोला, म्हणाला, जगातील सर्वोत्तम..
Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now