Share

पवारांच्या घरावरील हल्ल्यात आमची काही चूक नाही, जे केलं ते सदावर्तेंनी केलं; आरोपींची कबुली

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी ११० कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली होती. (abhishek patil on gunrata sadavarte)

आता याप्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपींनी गुणरत्न सदावर्तेंकडे बोट दाखवले आहे. या हल्ल्यामध्ये आपली काही भूमिका नसून सर्वकाही केलं ते सदावर्तेंनी केलं, अशी कबूली आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी याने दिली आहे.

या प्रकरणातील आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकात सुर्यवंशी यांनी आपल्याला न्यायाधीशांशी बोलायचं आहे, अशी विनंती केली होती. आम्हाला न्यायाधीशांना काही सांगायचे आहे, असे ते म्हणत होते. त्यानंतर न्यायाधीशांनी त्यांच्याशी संवाद साधला होता.

या प्रकरणात आमचा काहीही रोल नाही. आम्ही आरोपी नाही, या सगळ्या गोष्टी गुणरत्न सदावर्ते यांनी केल्या आहे, असे अभिषेक पाटीलने म्हटले आहे. तर तशाच प्रकारची कबूली चंद्रकांत सुर्यवंशी यानेही दिली आहे. या कबूलीमुळे आता गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

आरोपी अभिषेक आणि संदीप गोडबोले यांच्यात झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग मुंबई पोलिसांच्या हाती लागलेले आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर या दोघांनी एकमेकांशी संवाद साधला होता. या संभाषणात या आंदोलकांना तिकीटासाठी पैसे दिल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या पोलिस कोठडीत सुटल्यानंतर सातारा पोलिसही त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या प्रकरणी त्यांच्यावर सातारा, अकोला आणि कोल्हापूरमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या सलग सहाव्या पराभवानंतर निराश झाला रोहित; म्हणाला, काय चूक होतेय माहिती नाही, पण…
झोपेच्या गोळ्या देऊन उपचारासाठी आलेल्या मुलीवर डॉक्टर करायचा बलात्कार, २३ वर्षांनी असा झाला खुलासा
रणबीर कपूरला लग्नात सासूकडून मिळाले तब्बल एवढ्या कोटींचे गिफ्ट, किंमत वाचून डोळे होतील पांढरे

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now