Share

Abhimanyu ishwaran : मुलासाठी बापाने उभारलं क्रिकेटचं स्टेडियम, मुलाने तिथेच शतक झळकावत बापाचं स्वप्न साकार केलं

Abhimanyu ishwaran | रणजी ट्रॉफीमधील उत्तराखंड विरुद्ध बंगाल सामन्यात अभिमन्यू ईश्वरनने शानदार शतक झळकावले. त्याने हे शतक अभिमन्यू क्रिकेट अकादमीमध्ये झळकावले. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, त्याच्या नावावर असलेल्या स्टेडियममध्ये क्रिकेटपटूने शतक झळकावे हे खरोखरच मनोरंजक आहे.

आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे हे स्टेडियम त्याच्या वडिलांनी बांधले होते. स्वतः ईश्वरनने त्याच स्टेडियममध्ये शानदार शतक झळकावल्यानंतर आनंद व्यक्त केला. त्याच्यासाठी हा आयुष्यातील एक खुप महत्वाचा क्षण होता. पीटीआयशी बोलताना अभिमन्यू ईश्वरनने आपला आनंद व्यक्त केला.

तो म्हणाला की, ‘या स्टेडियममध्ये खेळणे आणि येथे शतक झळकावणे माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही मैदानावर चांगले खेळता आणि शतक झळकावता तेव्हा आनंद तर होतोच. पण त्याच्याच नावावर असलेल्या या स्टेडियममध्ये शतक झळकावणे हा एक अद्भुत अनुभव आहे.

विशेषत: जिथे माझ्या वडिलांचा विशेष संबंध आहे त्या स्टेडियमध्ये शतक झळकावून मला खुप आनंद झाला. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, 2005 मध्ये अभिमन्यू ईश्वरनचे वडील आरपी ईश्वरन यांनी डेहराडूनमध्ये जमीन खरेदी केली होती. यापूर्वी त्यांनी येथे क्रिकेट अकादमी बांधली होती परंतु नंतर त्याचे नाव अभिमन्यू स्टेडियम असे करण्यात आले.

आरपी ईश्वरन महाभारतातील अभिमन्यू या पात्राने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी आपल्या मुलाचे नाव त्याच्या नावावर ठेवले. या सामन्यात अभिमन्यूने 128 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अभिमन्यूने 10 चौकार आणि 1 षटकार लगावत 113 धावा केल्या होत्या.

अभिमन्यू सध्या बंगाल संघाकडून खेळत असून त्याची टीम इंडियासाठी निवड झाली आहे मात्र त्याला अद्याप पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीचे बक्षीस त्याला मिळू शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टीम इंडियामध्ये प्रवेश मिळू शकतो, असेही बीसीसीआयने नवीन वर्षाच्या पहिल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now