लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. गेल्यावर्षीच म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी लग्न गाठ बांधत एका सुखी संसाराला सुरूवात केली होती. पण असे असतानाच मेहुलला कॅन्सर झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. (abhidnya bhave share update her husband condition)
मेहुलवर सध्या कॅन्सरवरचे उपचार सुरू आहे. तसेच त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अशी माहिती अभिज्ञाने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली आहे. यावेळी पतीच्या या आजाराबद्दल बोलताना ती खुप भावूक झाली होती. त्याचाही व्हिडिओ समोर आला आहे.
अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर लाईव्हच्या मदतीने चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी ती मेहूलच्या कॅन्सरबद्दल बोलताना भावूक झालेली दिसली. या लाईव्हमध्ये अभिज्ञाला एका चाहत्याने तिच्या घरचे कसे आहे? असा प्रश्न विचारला होता, त्यावेळी ती खुप भावूक झाली होती.
मी काही महिन्यानंतर इन्स्टाग्रामवर लाईव्ह येण्याचा निर्णय घेतला. कारण मी माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे व्यस्त होते. मला आधी बरं वाटत नव्हतं, पण आता मला वाटतं की मी ठीक आहे. मेहूलसुद्धा ठीक आहे. घरी सर्वजण ठीक आहे.मेहूल बरा होत असून त्याच्यावर उपचार सुरू आहे, असे अभिज्ञा भावेने म्हटले आहे.
तसेच यावेळी तिने मेहून कधीपर्यंत बरा होईल हेही सांगितले आहे. तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीसाठी तुमचे आभार. मेहूल बरा होतोय. कदाचित एक-दोन महिन्यांत तो पूर्णपणे बरा होईल. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर मला तुमच्या प्रेमाची गरज आहे, असे अभिज्ञा भावेने म्हटले आहे.
दरम्यान, अभिज्ञा भावे ही खुप लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सध्या तु तेव्हा तशी या मालिकेत पुष्पवल्ली या पात्राची भूमिका साकारत आहे. या मालिकेत अभिज्ञा नकारात्मक भूमिकेत दिसून येत आहे. तसेच या मालिकेत मुख्य भूमिकेत स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळकर आहेत.
महत्वाच्या बातम्या-
सिल्क स्मितासह ‘या’ 10 बी-ग्रेड साऊथच्या अभिनेत्रींनी ओलांडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, पहा फोटो
महागाईच्या प्रश्नावर भडकले बाबा रामदेव; म्हणाले, काय करायचंय ते करून घे, शांत राहा, नाहीतर..
राजामौलींच्या RRR चित्रपटाशी संबंधित पोस्ट डिलीट का केल्या? आलिया भट्टने केला मोठा खुलासा