Abdul sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार स्वातंत्र्यदिनानिमित्त जालना शहरात ध्वजारोहन कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी अडवलं. ध्वजारोहन केल्यानंतर त्यांना अडवण्यात आलं. जालना शहराजवळील कन्हैयानगर येथे अर्धवट रस्त्यावरील खड्ड्यात पडून जामवाडी येथील एका शेतकऱ्याला मृत्यु झाला होता.
त्या प्रकरणावरून आधीच लोकं संतापले होते. त्यामुळे आज ध्वजारोहन झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांना शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी अब्दुल सत्तार यांना अडवलं आणि त्यांना याबाबत काहीतरी पाऊलं उचलण्यास सांगितले. अब्दुल सत्तार यांनीही याबाबत चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.
जालनामध्येच एका महिलेने अब्दुल सत्तार यांना पुन्हा अडवलं. त्या महिलेने थेट पोलिसांविरोधातच तक्रार करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात अडवलं. ऍड. रिमा खरात असे त्या महिलेचे नाव आहे. तिने सांगितलं की, शहरात एका दाम्पत्याचं स्टेशनरीचं दुकान होते.
हे दुकान रिकामं करण्यासाठी घर मालकानं पोलिसांना सुपारी दिली आणि दुकानातला १५ लाखांचा माल परस्पर पोलिसांनी लंपास केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्या महिलेने उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू यांच्यावर हे सगळे आरोप केले आहेत.
झेंडावंदन झाल्यानंतर महिलेने अब्दुल सत्तार यांना अडवलं आणि त्यांना घडलेली घटना सांगितली. या प्रकरणात चौकशी करण्यात येईल असं सत्तार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हा प्रकार झाल्यानंतर ऍड. रिमा खरात यांनी माध्यमांना सांगितलं की, आम्ही कृषीमंत्र्यांना अडवलं कारण जालन्यात काळोख पसरला आहे.
या काळोखावर मात करण्यासाठी आम्ही त्यांना कंदील देऊन उजेडाची जाणीव करून देणार होतो. पण आमचा कंदील जप्त करण्यात आला. कंदील जप्त केल्यानंतर आम्ही स्वातंत्र्याचं प्रतीक असलेला तिरंगा ध्वज देण्यासाठी आणला. आज देशात जरी स्वातंत्र्य असलं तरी आम्ही पारतंत्र्य अनुभवत आहोत, असं त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
Vinayak Mete : विनायक मेटेंच्या गाडीला धडक देणारा ट्रक आणि चालक सापडला, पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध
दु्य्यम खाते मिळाल्याने नाराज? दादा भुसे स्पष्टच बोलले, म्हणाले, मला मिळालेल्या मंत्रीपदामुळे मी…
एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तरीही राजन विचारे मध्यरात्री शिवसैनिकांसह होते उपस्थित
मोदी-शहांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलंच नव्हतं, एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा