Share

सत्तारांना शिंदेगटातील नेत्यांनी घेरले; म्हणाले, माझ्या गटातील नेत्यांनीच माझ्याविरूद्ध कट करून…

eknath shinde abdul sattar

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिंदे गटातील नेत्यांनीच माझ्याविरुद्ध कट रचला जात आहे, असे शिंदेगटातील नेते अब्दुल सत्तार यांनी व्यक्तव्य एका मुलाखतित केले आहे.

या व्यक्तव्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुराघोडी सुरु आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
वाशिम येथील गायरान जमिन प्रकरण तसेच सिल्लोड येथील कृषी महोत्सव टीईटी घोटाळायावरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप झालेले आहेत. त्यांनी या आरोपांना विधानसभेत चोख उत्तरही दिले.

१ जानेवारी २०२३ पासून अब्दुल सत्तारांच्या मतदार संघात कृषी महोत्सवाला सुरवात होत आहे. याच महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार असे बोलले जात आहे.

या सगळ्याची पार्शवभूमी बघता अब्दुल सत्तारांवर गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या आरोपांबाबत आपले मौन सोडले आहे. झालेल्या आरोपांबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्टीकरण दिले आहे असे अब्दुल सत्तार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या घरातल्या गोष्टी बाहेर येतात कशा? या अब्दुल सत्त्तारांच्या विधानामुळे शिंदे गटातसुद्धा अंतर्गत खटाटोप सुरू की काय, असे प्रश्न उपस्थित होतांना दिसताय.

आता ही अंतर्गत कुरघोडी नेमकी कोणामुळे निर्माण झाली, तो नेता सत्तारांच्याच मतदार संघातील आहे की दुसऱ्या मतदार संघातील आहे.या सगळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ता रांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वातावरणात कोणते पडसाद उमटतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार; शिंदे गटातील मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट
abdul sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ, मुलीच्या नोकरीबद्दल धक्कादायक माहिती आली समोर
shinde group : शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा भर रस्त्यात भाजप नेत्यावर खुनी हल्ला; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now