abdul sattar daughter shocking information | राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. अशात राज्याचे मंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार हे वादग्रस्त विधानामुळे चांगलेच चर्चेत आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे. आता अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे.
अब्दुल सत्तार यांच्या मुलीची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली होती. या नेमणूकीवरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बारामतीचे कार्यकर्ते नितीन यादव यांना माहिती अधिकारातून एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार हे अडचणीत सापडू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक भरती पदावर राज्य शासनाने रितसर २ मे २०१२ पासून बंदी घातली होती. असे असतानाही अब्दुल सत्तार यांची मुलगी शेख हिना कौसर हिची १६ ऑगस्ट २०१८ रोजी शिक्षण सेवक म्हणून कायमची नेमणूक झाली होती.
तसेच ही नेमणूक करत असताना शिक्षण सेवक म्हणून कायम स्वरुपीची नेमणूक करण्यासाठी जे टीईटीचे प्रमाणपत्र बंधनकारक असते. ते टीईटी प्रमाणपत्रच शासनाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
टीईटीचे प्रमाणपत्र शासनाकडे जमा केलेले नसतानाही शेख हिना कौसरची शिक्षण सेवक म्हणून निवड झाली होती. प्रमाणपत्राशिवायच अब्दुल सत्तारांच्या मुलीची नियुक्ती करण्यात आल्यामुळे आता सत्तारही या वादात अडकण्याची शक्यता आहे.
तसेच शासनारडे अब्दुल सत्तार यांच्या मुलीने आणखी काही प्रमाणपत्रे सादर केली होती. त्यामधील आधारकार्ड, पॅनकार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जन्म तारखा या वेगवेगळ्या आहे. तर दुसऱ्या मुलीची तर कार्यालयात माहितीच उपलब्ध नाहीये.
महत्वाच्या बातम्या-
‘आदित्य ठाकरेंना सोडणार नाही, त्याने दिशा सालियनवर अत्याचार केले, त्याला तुरूंगात पाठवणारच’
8वी पास अभिजित सराग कसा झाला कालीचरण महाराज? वाचा कहाणी.. ‘या’ महाराजांशी होते खास नाते
आईची शेवटची इच्छा पुर्ण करण्यासाठी मुलीने ICU मध्येच केले लग्न; 2 तासांनी आईने सोडले प्राण