Corona: कोरोना (corona) महामारीने पुन्हा एकदा लोकांना हदरवून टाकले आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जपानमध्ये (Japan) तर कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दररोज लाखो नवीन प्रकरणे समोर येत आहेत.
चीनमध्ये पुन्हा एकदा कोविड-19 चा फैलाव झाल्याने जग पुन्हा एकदा कोरोनामुळे घाबरले आहे. लोक घराबाहेर पडण्यास देखील घाबरत आहेत. आजारी लोकांनाही औषध खरेदीसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते. त्याच वेळी, रुग्णालयात कोविड रुग्णांची संख्या वाढली असुन मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या तीन महिन्यांत जपानमध्ये कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूची संख्या गेल्या वर्षीच्या आणि आताच्या तुलनेत 16 पट जास्त आहे. तर सध्या जपान कोरोना महामारीच्या आठव्या लाटेतून जात आहे. गेल्यावर्षी 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत रोज फक्त 3 ते 4 लोकांचा मृत्यू होत होता.
पण कल्याण मंत्रालयाने जारी केल्या आकडेवारीनुसार, या वर्षी याच आठवड्यात तब्बल 415 ते 420 इतके लोक मृत्युमुखी पडत आहेत. या आठवड्यात एकूण 2,283 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, 1 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत गेल्या वर्षी याच वेळी 744 मृत्यू झाले होते. तर या वर्षी त्याच वेळी 11,853 मृत्यू झाले आहेत.
तसेच, 90हून अधिक वयाच्या लोकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. 70 ते 80 या वयोगटातील लोकांच्या मृत्यूचा दर 40.8 टक्के इतका आहे. जपानमध्ये शनिवारी 107,465 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर शुक्रवारच्या तुलनेत देशभरात नोंदवलेल्या कोविड-संबंधित मृत्यूंची संख्या 292 वर आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाची साथ पसरवणाऱ्या चीनला आता स्वतःच्या चुकीची शिक्षा भोगावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांत असे अनेक अहवाल समोर आले, ज्यामध्ये चीनला जबाबदार धरण्यात आले. पण तिथून महामारी पसरली यावर चीनचा सुरुवातीपासून विश्वास नव्हता. मात्र, आताची परिस्थिती पहाता चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- pune : पुणेकरांचा नाद करायचा नाय! एका पठ्ठ्याने झोमॅटोवरुन ऑर्डर केले तब्बल २८ लाखांचे जेवण
- भारतातील ‘हे’ गाव आहे आशियातील सर्वात श्रीमंत गाव; वर्षभर एकच फळ विकतात अन् थेट करोडपती बनतात
- आंबेडकरांसाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार, पण…; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य