arvind kejriwal : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राज्यांमध्ये भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, गुजरातमध्ये देखील भाजपने चांगलीच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
गुजरातमध्ये भाजप आणि ‘आप’मध्ये चांगलीच लढत पाहायला मिळतं आहे. यंदाच्या वर्षाखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी सध्या गुजरातमध्ये भाजप आणि आप’चे नेते चांगलेच सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. खुद्द अरविंद केजरीवाल हे मैदानात उतरले आहेत.
केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष देखील जोमाने कामाला लागला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील कार्यकर्त्यांशी केजरीवाल संवाद साधत आहेत. निवडणुकांसाठी रणनीती आखतं आहेत.
दौऱ्यादरम्यान, रविवारी केजरीवाल यांनी राजकोट येथील पत्रकार परिषदेत एक मोठा दावा केला. ‘Intelligence Bureau ने केंद्र सरकारला दिलेल्या अहवालात, गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार येईल, असे म्हटले आहे. ‘आप’चे सरकार फार कमी फरकाने येणार आहे. आपण खूप कमी जागांनी पुढे असणार आहोत.’
पुढे बोलताना केजरीवाल यांनी म्हंटलं आहे की, काँग्रेसमधील काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र, भाजपने त्यांना काँग्रेसमध्येच राहण्यास सांगितले आहे.भाजपला काँग्रेसच्या माध्यमातून विरोधकांच्या मतांचे विभाजन करायच आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
दरम्यान, यामुळे आता गुजरातचा किल्ला कोण काबिज करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजप आणि आपने रणनीति आखण्यास सुरुवात केली असून सध्या आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहेत. नुकताच केजरीवाल यांनी केलेल्या दाव्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.