पाकिस्तानचे खासदार अमीर लियाकत हुसेन यांनी पुन्हा लग्न केले आहे. ४९ वर्षीय खासदार आमिर लियाकत हुसेन यांनी सईदा दानिया शाह या १८ वर्षीय मुलीशी विवाह केला आहे. आमिर लियाकत हुसेन हे पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे सदस्य आहेत. (aamir liyaqat third wedding)
तसेच आमिर हे एक प्रसिद्ध टेलिव्हिजन होस्ट देखील आहे. पीटीआयचे खासदार डॉ.आमिर लियाकत हुसेन यांचे हे तिसरे लग्न आहे. सईदा दानिया शाह आणि आमिर लियाकत हुसैन हे दोघेही बुधवारी विवाहबंधनात अडकले. आमिर लियाकत हुसैन यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे सईदा दानिया शाहसोबत लग्न केल्याची माहिती दिली. धक्कादायक गोष्ट म्हणजे घटस्फोटाच्या दिवशीच त्यांनी तिसरे लग्न केले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या पक्षाचे खासदार अमीर लियाकत हुसैन आणि सईदा दानिया शाह यांचे लग्नाबद्दल अभिनंदन केले आहे. तर आमिर लियाकत हुसैन यांनी इम्रान खानचे अभिनंदन केले, त्यामुळे त्यांचे आभार मानले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आमिर यांच्या दुसऱ्या पत्नीनेही त्याच दिवशी त्यांना घटस्फोट दिला आहे. बुधवारी आमिरची दुसरी पत्नी अभिनेत्री तुबा आमिरने इंस्टाग्रामवरूनच आमिरपासून घटस्फोट घेतल्याचे सांगितले होते. इंस्टाग्रामवर आपल्या नवीन पत्नीसोबतचा एक फोटो शेअर करताना पीटीआय खासदार म्हणाले, काल रात्री १८ वर्षीय सईदा दानिया शाहसोबत लग्न झाले. ती दक्षिण पंजाबमधील लोधरण येथील एका प्रतिष्ठित सादत कुटुंबातून आली आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे खासदार आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन होस्ट आमिर लियाकत हुसैन यांनी आपल्या तिसऱ्या पत्नीचे कौतुक केले. ते म्हणाले की, सईदा दानिया अतिशय गोड, सुंदर आणि साधी आहे. दुस-या लग्नाच्या निर्णयाबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. आयुष्यातील वाईट काळ मागे सोडल्याचे त्यांनी सांगितले.
आमिर यांनी दुसऱ्या पत्नीशी लग्न करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. आमिर लियाकतची दुसरी पत्नी तुबा हिने खुलासा करताना सांगितले होते की, दोघेही गेल्या १४ महिन्यांपासून वेगळे राहत होते. घटस्फोटाशिवाय दुसरा मार्ग नसल्यामुळे लोकांनी त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, असे तिने लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझरने जिंकले सर्वांचे मन, या दिवशी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
एकता कपूरच्या यशामागे आहे अशोक सराफ यांचा हात, एकताने सांगितले खरे कारण…
“… लक्षात ठेवा आमचे सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही, जय महाराष्ट्र!”