२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या मराठी भाषा दिनाची महाराष्ट्रात चर्चा असून अनेक नेत्यांनी, कलाकारांनी या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. आता मराठी भाषा दिनानिमित्त आमिर खाननेही मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. (aamir khan on shivaji maharaj role)
आज मला मराठीबद्दल इतका आत्मविश्वास आहे की, जर उत्तम संहिता मिळाली तर मला मराठी सिनेमा नक्की करेल. माझी अडचण अशी आहे की माझी मातृभाषा उर्दू आहे. ती मला बोलता येते, पण उर्दू मला वाचता येत नाही. पण मराठी भाषा ही देवनागरी लिपीत असल्यामुळे मला ती वाचता यायची, परंतू समजत नसायची, असे आमिर खानने म्हटले आहे.
तसेच मित्रपरीवारही हिंदी-इंग्रजीत बोलायचे. त्यामुळे तीच संवादाची आणि व्यवहाराची भाषा झाली. मला राजभाषा येत नाही, याची मला लाज वाटायची. पण वयाच्या चाळीशीत प्रवेश केल्यानंतर मला जाणवले की आपल्याला आपली राजभाषा न येणे ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. त्यातूनच मी मराठी शिकण्याचा निश्चय केला होता, असे आमिर खानने म्हटले आहे. याबाबत त्याने एक किस्साही सांगितला आहे.
मराठी शिकण्याचा निर्णय मी किरण, माझा मुलगा जुनैद, मुलगी आरा यांना सांगितला. त्यांनी देखील माझ्यासोबत मराठी शिकण्याची तयारी दाखवली. अभिनेता आणि माझा मित्र अतुल कुलकर्णी यांच्याशी यासंदर्भात बोलणे झाले आणि त्यांनी सुहास लिमये या सरांशी संपर्क करुन दिला. त्यानंतर मराठीचा क्लास आमच्या घरी भरु लागला, मी चार वर्षे मराठी शिकलो, असे आमिर खानने म्हटले आहे.
तसेच शुटींगच्या दरम्यान लिमये सर सोबत असायचे. सरांनी मला मराठी भाषेतील प्रतिभावान लेखक, कवी यांच्या साहित्याशी ओळख करुन दिली. भाषा शिकण्याच्या वाटेवरुन साहित्याच्या या प्रवासात मला प्रतिभा आणि कल्पनांचे नवे आकाश गवसले, असे आमिर खानने म्हटले आहे.
तसेच मला मराठी चित्रपटात काम करण्याची खुप इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे आणि मला एकदा तरी शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची तीव्र इच्छा आहे, असेही आमिर खानने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘हा’ खेळाडूच भारतीय संघाचा खरा हिरो; कर्णधार रोहीत शर्माने केले तोंडभरून कौतूक
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा अजबच हट्ट; ‘माझ्या कुत्र्याची सुटका करा तरच मी भारतात येईल’
महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अधिकाऱ्याने महिलेवर केला बलात्कार; महाराष्ट्र हादरला