अमिताभ बच्चन आणि आकाश ठोसर स्टारर ‘झुंड’च्या स्क्रीनिंगचा व्हिडिओ निर्मात्यांनी जारी केला आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अभिनेता आमिर खान उपस्थित होता. स्क्रीनिंग पाहिल्यानंतर तो खूप भावूक झाला. त्याच्याही डोळ्यातून अश्रू आले. त्याने चित्रपटाचे तसेच दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि कलाकारांचे कौतुक केले. विशेषत: बालकलाकाराच्या अभिनयाचे त्याने कौतुक केले. इतकेच नाही तर त्याने चित्रपटाच्या टीमलाही आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले आहे. (aamir khan on amitabh bachchan jhund character)
अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ची निर्मिती संदीप सिंग आणि टी-सीरिजने केली आहे. टी-सीरीजने आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आमिर खान भावनिक होत हाताने अश्रू पुसताना दिसतो. तो म्हणतो, पहिल्यांदाच स्टँडिंग ओव्हेशन आहे. त्यानंतर चित्रपटाची काही झलक पाहायला मिळत आहे.
आमिर खान म्हणाला, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. भारतातील मुला-मुलींमधली तुम्ही जी भावना पकडली आहे ती अविश्वसनीय आहे. तसेच मुलांनी केलेला अभिनयही अप्रतिम आहे. हा खूप चांगला चित्रपट आहे. अदभूत. हे खूप अद्वितीय आहे.
आमिर खान पुढे म्हणाला की, हा चित्रपट मी आतापर्यंत २०-३० वर्षांपासून केलेल्या कामाला फुल्लस्टॉप लावतो. आमिर खानने अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे. तो म्हणाला की, बच्चनसाहेबांनी काय काम केले आहे. त्यांनी एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. पण हा त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. हा त्यांचा सर्वात मोठा चित्रपट आहे.
यानंतर आमिर खान ‘झुंड’मध्ये काम करणाऱ्या कलाकारांना भेटतो. आमिरला भेटताना आकाश ठोसरही थोडा भावूक झाला आहे. यानंतर तो चित्रपटाच्या संपूर्ण टीमला त्याच्या घरी येण्याचे आमंत्रण देतो. यानंतर त्याच्या घराची झलक पाहायला मिळते. जिथे तो आपला मुलगा आझादची चित्रपटाच्या टीमशी ओळख करून देतो आणि चित्रपटाबद्दल बोलतो.
दरम्यान, झुंडमध्ये अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत जे निवृत्त झाले आहेत. पण झोपडीत राहणाऱ्या मुलांना ते फुटबॉल शिकवतात. रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांनी आधी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता, पण नंतर आमिरच्या सांगण्यावरून त्यांनी होकार दिला. आमिर खान ‘झुंड’चे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या दिग्दर्शनाचा फॅन आहे.
महत्वाच्या बातम्या-
बाबो! भारतीय लोक पान खाऊन थुंकले तर २११ स्विमिंग पूल भरतील, ‘या’ शहरातील लोक थुंकण्यात आहेत आघाडीवर
भारताची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री झाली अमेरिकन आर्मीमध्ये भरती, लोक करताय कौतूकांचा वर्षाव
आता चोर घरात शिरला की वाजणार अलार्म, airtel ने फक्त ९९ रुपयांत आणले भन्नाट डिव्हाईस