बॉलिवूड ही खुपच ग्लॅमरसने भरलेली दुनिया आहे, परंतू इथे कोणाचे नाते कसे आहे हे सांगणे कठीण आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहे, ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये २० पेक्षा जास्त वर्ष झाले आहे, असे असले तरी त्यांनी सोबत काम केलेले नाही. त्यातलीच एक जोडी म्हणजे ऐश्वर्या राय आणि आमिर खान. (aamir khan and aishwarya rai dont work in film)
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला सर्वजण ओळखतात, तिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ऐश्वर्या रायची अभिनय कारकीर्द देखील चांगली होती आणि याचे कारण म्हणजे अभिनेत्रीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट दिले आहेत.
ऐश्वर्याने तिच्या अभिनयाने लोकांना वेड लावले आहे. तिने अनेक कलाकारांसोबत कामे केले आहे. पण तिने कधीच आमिर खानसोबत काम केलेले नाही. जे की सध्या चर्चेता विषय ठरला आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत की दोघांनी कधीही एकत्र काम का केले नाही?
असे म्हणतात ऐश्वर्याला आमिर आणि आमिर खानला ऐश्वर्या अजिबात आवडत नाही. आमिर खान हा खूप विनोदी व्यक्ती असल्याचे म्हटले जाते. त्याने अनेक अभिनेत्रींसोबत मस्करी केली आहे, मात्र ऐश्वर्या रायला ही गोष्ट आवडत नाही. तसेच खरे पाहता त्यांना एकमेकांचा स्वभाव आवडत नाही, त्यामुळे ते कधीही कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत.
हे दोघेही एकदाच कोकच्या जाहिरातीत दिसले होते. यानंतर ऐश्वर्याने आमिरसोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यावेळी आमिरने ऐश्वर्यासोबत मस्करी केली होती. आमिर खानची मस्करी ऐश्वर्याला समजली नाही आणि तिने आमिरला थांबवलेही पण आमिर खान थांबला नाही. त्यामुळे ऐश्वर्याला राग आला. जाहिरातीनंतर ऐश्वर्याने ठरवले की, ती आमिर खानसोबत कधीही काम करणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेना नेत्याने मातोश्रीला दिलेल्या २ कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणाले, मातोश्री म्हणजे माझी आई
दिल्लीने केला मुंबईचा सुपडा साफ, ४ विकेटने जिंकला सामना; मुंबईचा नेहमीप्रमाणे पहिला सामना देवाला
VIDEO: इंडियन आर्मीने चीनला दाखवली ताकद, 600 पॅराट्रूपर्सनी चीनच्या सीमेजवळ आकाशातून मारल्या उड्या