Share

व्हॅलेंटाईनच्या दिवशीचा खासदाराचा बेडवरचा व्हिडिओ व्हायरल; १८ वर्षाच्या पत्नीसोबत करत होता मस्ती

पाकिस्तानी खासदार आमिर लियाकत हुसैन आणि त्यांची पत्नी सय्यदा दानिया शाह यांचे रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आमिर आणि दानियाची जोडी आणि त्यांच्या रोमँटिक व्हिडिओंवरही लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

दानियाने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून अनेक रोमँटिक व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये, दानिया तिच्या पतीची स्तुती करताना दिसत आहे. आता दानियाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये दानिया आणि आमिर एकमेकांशी बोलत आहेत. त्यांच्या बॅकग्राऊंडला एक बॉलिवूड गाणे वाजत आहे. या व्हिडिओमध्ये दानिया आमिरसोबत खूप खुश दिसत आहे. पण आमिर आणि त्यांची पत्नी त्यांचे खासगी व्हिडिओ का शेअर करत आहेत, याबद्दल काही लोक नाराजी व्यक्त करत आहेत.

दानियाने आणखी एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेता इस्लामचा हवाला देत मुस्लिम पुरुषांना चार लग्न करण्यास सांगत आहे. व्हिडिओ शेअर करताना दानियाने लिहिले की, ‘हे आमिर लियाकतसाठी आहे. धन्यवाद…माझा नवरा खुप इस्लामिक आहे.’

कुराणानुसार इस्लाममध्ये चार विवाहांना विशेष परिस्थितीत मान्यता देण्यात आली आहे. याबाबत आमिरने एका मुलाखतीदरम्यान गंमतीने सांगितले की, इस्लाममध्ये चार नव्हे तर १७ लग्नांना परवानगी आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इस्लाम चार लग्नांना परवानगी देत नाही… पण दोन करा, तीन करा, चार करा, चार करा, असे त्यांनी म्हटले आहे. म्हणजे एकूण १७ विवाहांना परवानगी आहे. मला असे म्हणायचे आहे की एका वेळी चार लग्नांना परवानगी आहे. त्यांच्यापैकी कोणाचा मृत्यू झाला तर ते पुन्हा लग्न करू शकतात, असे आमिर म्हणताना दिसून येत आहे.

आमिर लियाकतला प्रश्न करण्यात आला की, लोक म्हणत आहेत की आमिर लियाकत आता आणखी लग्न करेल. याला उत्तर देताना आमिर म्हणाले की. मी जिच्याशी लग्न केले आहे, तिला काही अडचण नाही, मग तुम्हाला काय अडचण होत आहे. याला म्हणतात बेगानी शादी मधील अब्दुल्ला दिवाना.

महत्वाच्या बातम्या-
RCB मध्ये विराटची जागा घेणार फाफ डू प्लेसिस? प्रशिक्षकांनी दिली महत्वाची माहिती
गड चढत असताना तरुणाचा मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर….
डोनाल्ड ट्रम्प यांचा नाद नाय! सोबत फोटो काढायला २२ लाख आणि चहा प्यायला घेतात तब्बल ‘एवढे’ रुपये

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now