पंजाब विधानसभेच्या 117 जागांचे निकाल येत आहेत. गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीचा कल आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) बाजूने येताना दिसत होता, पण नंतर वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं. काँग्रेस (Congress) जोरदार टक्कर देत पुढे निघताना दिसत होते पण आपने जोरदार टक्कर दिली आहे.
काँग्रेसला जोरदार धक्का देत आप बहुमताच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. आम आदमी पार्टीने ७४ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसला ३० आणि अकाली दल १० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीची पंजाबमध्ये बल्ले बल्ले होताना दिसत आहे.
या निवडणुकीत भाजप आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब लोक काँग्रेस सोबत युती करून निवडणूक लढवत आहेत, तर शिरोमणी अकाली दल बसपासोबत रिंगणात आहे. दुसरीकडे आम आदमी पक्ष एकटाच लढत असताना आम आदमी पार्टीने जोरदर टक्कर दिली आहे.
एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमत मिळू शकते. तर काँग्रेसच्या जागा पूर्वीपेक्षा खूपच कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच एक्झीट पोल्सनी आम आदमी पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. हीच आघाडी जर कायम राहिली तर पंजाबमध्ये सत्तातर होण्यास वेळ लागणार नाही.
पंजाबमध्ये मुख्य लढत सत्ताधारी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात असल्याचे मानले जात आहे. आम आदमी पार्टीने भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे, तर काँग्रेसने मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
पंजाबमध्ये सगळे दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. सिद्धू, चन्नी या दिग्गज नेत्यांना धक्का बसला आहे. आम आदमी पार्टीवर लोकांचा विश्वास वाढत चालला आहे. एका तासात निकालाचे चित्र बदलताना दिसत आहे. भाजपला पंजाबमध्ये फक्त ३ जागा मिळाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
पंजाबात काॅंग्रेसची पुन्हा जोरदार मुसंडी; आपचा वेग मंदावला
गोव्यात काँग्रेसचे सरकार येणार, काँग्रेसची २० जागांवर आघाडी; भाजप मात्र पिछाडीवर
उत्तराखंडात भाजप-काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर; हरीश रावत म्हणाले, देवाची कृपा आहे, काँग्रेसच येणार
मिस युनिव्हर्स स्पर्धेत इंग्रजी बोलताना अडखळली होती सुष्मिता सेन, पण ‘या’ उत्तराने जिंकले विजेतेपद