टेलीव्हिजनविश्वात सध्या प्रचंड लोकप्रिय असलेली ’आई कुठे काय करते’ मालिकेने एक वेगळंच वळण घेतलेलं आपल्याला बघायला मिळतंय. अरुंधतीला घरातून मिळणार्या पाठिंबा सहन होत नसल्याने आजीची चिड्चिड होते. तो राग सगळा साहाजिकच आप्पांवर निघतो. रागाच्या भरात ती आप्पांचा प्रचंड अपमान करते. अशातच दुखावलेले आप्पा ’समृद्धी’ सोडतात आणि अरुंधतीकडे येतात.
याच मालिकेची संकल्पना घेऊन हिंदीमध्ये अनुपमा मालिकेची निर्मिती करण्यात आली. ही मालिकाही प्रचंड लोकप्रिय झाली आहे. विवाहबाह्य संबंध हा विषय मध्यवर्ती घेऊन साकारण्यात आला असला तरी आयुष्यात अचानक आलेल्या वादळामुळे स्त्री कोलमडून न जाता आयुष्यात सक्षमपणे पुढे जाण्याचा निर्णय घेते आणि हळूहळू तिला परिस्थितीची तसेच घरच्यांचीही साथ मिळते.
विवाहबाह्य संबंध आणि त्यामुळे स्त्रीच्या आयुष्यात झालेले बदल हा विषय यापूर्वीही अनेक मालिकांमधून दाखवण्यात आला आहे. परंतु, या मालिकेमध्ये इतर कोणावरही दोषारोप न करता आपाल्या जबाबदार्या, कर्तव्य चोखपणे बजावत ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करताना दिसते.
’आई….’ मध्ये अरुंधतीला तिचा जुना मित्र आशुतोष तब्बल २६ वर्षांनी पुन्हा भेटलेला दाखवण्यात आला आहे. तर अनुपमा मध्ये अनुज तिच्या आयुष्यात येतो असे दाखवण्यात आले आहे. तो तर कॉलेजपासूनच तिच्या प्रेमात असतो. तिच्या आवडीला, तिच्या आयुष्यात असलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी तिच्या पाठीशी सक्षमपणे उभा राहतो. त्यामुळे कुटूंबातल्या प्रत्येक व्यक्तीएवढाच तोही तिच्यासाठी महत्वाचा होताना दिसतो.
अनुपमामध्ये तिने भाग घेतलेल्या स्पर्धेत नृत्य सादर करत तीने अनुजशी लग्न करण्याचा प्रस्ताव मान्य करत लग्नाला तयार झाली हे आपण पाहिलेच. यावरून आई कुठे काय करते यामध्येही अरुंधती करणार आशुतोषशी लग्न का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
महत्वाच्या बातम्या
पत्नी आणि सासूच्या विचित्र मागण्यांमुळे खचला; अखेर तरुणाने उचललं भयावह पाऊल, सुसाईड नोट वाचून हादराल
फी भरली नाही म्हणून हिसकावला पेपर; तणावातूनच विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, उडाली खळबळ
ब्रेकींग! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदाराचा अचानक मृत्यू; कारणही आले समोर
ब्रेकींग! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदाराचा अचानक मृत्यू; कारणही आले समोर