शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे मोठी फुट पडली आहे. बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपशी हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं आहे. शिंदे गटाने भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे सरकार स्थापन केले आहे. यामुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येऊन कोसळलं आहे.
राज्यात ‘शिंदे-फडणवीस’ सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत आता शिवसेनेला संघटनात्मक पातळीवरही गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. मागाठाणेतील दोन शाखाप्रमुख आणि तीन महिला शाखा संघटकांचे पदाचे राजीनामा दिले आहेत.
यामुळे आता शिवसेना पक्ष बांधणीसाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पुन्हा नव्या जोमाने शिवसेना चांगलीच कामाला लागली आहे. यासाठी आता खुद्द उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. शिवसेना पुन्हा राज्यात चांगलीच सक्रिय होताना पाहायला मिळत आहे.
शिवसेनेला लागलेली गळती थांबविण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ‘निष्ठा यात्रे’ची घोषणा केली आहे. आजपासूनच आदित्य ठाकरे हे जोमाने कामाला लागणार आहेत. शिवसैनिकांशी वैयक्तिक पातळीवर जाऊन संपर्क साधत पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. अशा आमदारांच्या मतदार संघात जाऊन स्वत: आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटाकडे जात आहेत.
पक्षाला लागलेली हीच गळती थांबवण्यासाठी खुद्द आदित्य ठाकरे आता मैदानत उतरले आहेत. भायखळा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला सुरूवात होणार आहे. यामुळे आता आदित्य ठाकरेंना यात किती यश मिळणार? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
२५ पैशांची जुनी नाणी रातोरात बदलू शकतात तुमचं भविष्य; १ मिनिटात होऊ शकता लखपती, कसं ते जाणून घ्या
उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला एकत्र आणण्यासाठी ‘ही’ अभिनेत्री मैदानात, मोदींना घातलं साकडं
‘घरात घुसून मारलं होतं ना..’; या बॉलिवूड दिग्दर्शकावर संतापली कंगना राणावत
जबरदस्त प्रेमकहाणी आणि सुपरहिट ऍक्शन, वाचा थॉर: लव्ह ऍन्ड थंडरचा रिव्ह्यु