शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० च्या आसपास आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या समोर मोठ्या प्रमाणात अडचणी उभ्या राहिल्या आहेत. राज्यात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे समर्थक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत आहेत.
तर अनेक ठिकाणी शिवसेना आणि शिंदे समर्थकांमद्धे बाचाबाची देखील झाली आहे. राजकीय नेतेमंडळींबरोबरच आता अभिनेते देखील राजकीय घडामोडींवर भाष्य करू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच हेमांगी कवी हिने देखील सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर सूचक व्यक्तव्य केलं होतं.
आता अभिनेते शरद पोंक्षे हे चांगलेच चर्चेत आले आहेत. पोंक्षे काही दिवसांपासून भाजपकडून असल्याच सातत्याने निदर्शनास येत आहे. तर आता भाजपचे देखील अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला पाठिंबा असल्याच बोललं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर पोंक्षे यांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे.
शिंदे गटाच्या समर्थनास पोंक्षे यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ‘कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात ! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय,’ त्यांनी स्वतःच्या दुसरं वादळ या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे.
पोंक्षे यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्यामुळे शिवसेना नेते आणि जेष्ठ अभिनेते आदेश बांदेकर चांगलेच भडकले आहेत. एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ शेयर करत आदेश बांदेकर यांनी पोंक्षे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हा शरद पोंक्षे तुच ना?’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, वाचा पोंक्षे यांनी काय म्हंटलं आहे त्या व्हिडिओत…
सगळ्यात पहिले धावून आला तो आदेश बांदेकर. मी आदेशला फोन केला आणि सांगितले की अशी-अशी शक्यता आहे. तर काय करू मला आता कळत नाहीय. आदेश बांदेकर म्हणाले, मी उद्याच्या उद्या तुला नांदेंकडे पाठवतो. त्यांच्याकडे पाठवले आणि मग ती सगळी प्रोसेस सुरु झाली.
त्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, शरद कसली काळजी करू नकोस शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी उभे आहोत. पैशापासून कसली काळजी करायची नाही.’ दरम्यान आता हा व्हिडिओ शेयर करत बांदेकर यांनी ‘हा शरद पोंक्षे तूच ना?’ असा सवाल विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते, त्यांचे नाव घेण्याचा सर्वांनाच अधिकार; संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
…म्हणून दोन वेळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देता देता थांबले, हैराण करणारी माहिती आली समोर
आमचे नेते उद्धव ठाकरेच असून कोणीही मातोश्रीवर आरोप करु नयेत; बंडखोर आमदाराचा इशारा कोणाला?
“शिवसेना काय आहे हे केसरकरांनी सांगू नये, मी आठवीत असल्यापासून शिवसेनेत आहे”