Share

छत्रपतींचे खरे गुरू कोण? राज्यपालांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ जूना व्हिडियो व्हायरल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबदल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात नवीन वादाला तोंड फुटले आहे. यादरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

शरद पवार यांच्याबदल व्हायरल झालेल्या व्हिडोओमध्ये ते छत्रपतींचे खरे गुरू कोण, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या व्हिडीओला राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये शरद पवार यांनी म्हटले आहे की, जे लोक सांगतात रामदास स्वामी महाराजांचे गुरू होते. ते खोटं आहे.

शिवाजी महाराजांचे खरे गुरू जिजाऊ माता होत्या. त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जिजाऊंनी केलं. शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला, तर रामदास नव्हते. शरद पवार यांनी पुढे म्हटले आहे की, ज्यांच्या हातात लेखणी होती, त्यांनी ही कमाल केली. त्यांनी इतिहासात रामदास गुरू असल्याचं लिहून ठेवलं.

शरद पवार यांनी एका कार्यक्रमात केलेले हे वक्तव्य आहे. त्यांच्या या व्हिडीओला खासदार सुप्रिया सुळे यांनीही शेअर केले आहे. दरम्यान औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वक्तव्य केले होते की, “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही.

प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.” पुढे कोश्यारी यांनी सांगितले की, आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे.

आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असे शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो. कोश्यारी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास पसरवण्यात येत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
६०० एपिसोडपर्यंत शिव्यांचा अक्षरशः वर्षाव झाला; ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत
आमिर खानने मराठी शिकण्यासाठी ‘या’ अभिनेत्याची घेतली होती मदत, स्वत:च खुलासा करत म्हणाला..
‘मी सीटबेल्ट लावले आणि गाडी दाणकन खांबावर घातली’, उदयनराजेंचा किस्सा ऐकून प्रेक्षकही अवाक
धक्कादायक! युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे हाल, पोलिसांनी केला गोळीबार, व्हिडीओ होतोय व्हायरल

राजकारण

Join WhatsApp

Join Now