Share

शिवसेनेला मोठा धक्का! आयकर विभागाच्या रडारवर ‘हा’ बडा नेता, IT विभागाने घरी मारली धाड

udhav thackeray

मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मलिक यांना अटक केल्यानंतर आता त्यांना 3 मार्चपर्यंत म्हणजे नऊ दिवसांची ईडीची कस्टडी देण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणी मलिक यांना ईडीने तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. (a team of enforcement directorate arrives at the residence of yashwant jadhav in mumbai)

अशातच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरच शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील नेते यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय आयकर विभागाने धाड टाकली आहे. बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

मागील ५ वर्षापासून यशवंत जाधव हे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच प्राप्तिकर विभागाचं पथक यशवंत जाधव यांच्या माझगावमधील निवासस्थानी दाखल झालं. माझगावमधील त्यांच्या निवासस्थानी तपास सुरु आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

जाणून घ्या सोमय्या यांनी आरोप करताना नेमकं काय म्हंटलं होतं. “यशवंत जाधव यांनी मनपाच्या टेंडरमधून मिळालेले 15 कोटींचं रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केलंय, जाधवांनी १५ कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉण्ड्रिंग करणाऱ्या मास्टरमाईंड उदय शंकर महावारला दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले.

त्यानंतर या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला. त्यानंतर हे 15 कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत, असे सोमय्यांनी आरोप करताना म्हंटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या
नवाब मलिकांना अटक होताच क्रांती रेडकर आक्रमक; म्हणाल्या, शत्रु राख में मिले..; पहा व्हिडीओ
आलिया भट्टने कंगना राणावतच्या ‘पापा की परी’ कमेंटवर दिले सडेतोड उत्तर, दिले थेट ‘भागवत गीते’चे ज्ञान
देशमुख-मलिकांनंतर तुरुंगात जाण्यासाठी ठाकरे सरकारमधील ‘डर्टी डझन’ रांगेत; पहा कोण आहेत ‘ते’ १२ जण
एक गुण वाढवण्यासाठी तीन वर्षे न्यायालयीन लढाई लढला, बोर्डाने चुक मान्य करत वाढवले २८ गुण

इतर आर्थिक क्राईम राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now