politics : सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट अन् बापाच्या नावाने थापा; भाजपने ठाकरेंना झापलेशिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे अवघ्या महाराष्ट्राने होताना पाहिले. पारंपारिक दसरा मेळावा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवतीर्थावर पार पडला. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला.
दोन्हीही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर तोफ डागली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत ‘गद्दार आम्ही नव्हे तर तुम्ही आहात’ असे ठणकावून सांगितले. यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीकेला बीकेसीवरून एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपबद्दल केलेल्या आरोपांचे भाजपकडून आता प्रतिउत्तर देण्यात येत आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रतिउत्तर देताना ट्विट करत म्हटले की, ‘सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट..आणि बापाच्या नावाने थापा. अरे हाच खरा थापा.. पण सध्या तरी वाफा आहेत. ते कोण बोलतेय? उद्धव ठाकरे की राहुल गांधी? तीच बिनडोक भाषा..’ या शब्दात अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवर खरमरी टीका केली.
पुढे उद्धव ठाकरेंनी ‘८ वर्षात पाकव्याप्त कश्मीरचा साधा तुकडाही ताब्यात घेता आला नाही, असं म्हणत केंद्रीय नेतृत्वावर ताशेरे ओढले. त्याबाबत भातखळकर म्हणाले, ‘अहो उद्धव ठाकरे टक्केवारी घेण्याइतक सोपं आहे का ते? त्याआधी ज्यांच्यामुळे देश खंडित झाला. पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकव्याप्त कश्मीर झाला. त्या काँग्रेसचे जोडे उचलताना त्यांनाही कधीतरी प्रश्न विचारा, असं म्हणत भातखळकरांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
काल शिवतीर्थावर शिवसैनिकांना संबोधित करताना ‘आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना सोबत घेऊन हिंदुत्व व्यापक केले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर ‘शिल्लक सेनेच्या सरबरीत हिंदुत्वाचे गुपित अखेर उघड झाले, अशा शब्दात भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
काल उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी, अमित शहांवर जोरदार टीका केली. ‘आमंत्रणही न मिळता पाकिस्तानी पंतप्रधानाच्या वाढदिवसाला जाऊन केक खाऊन येणारा तुमचा नेता.. अन् तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवावे काय?’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. आता त्यानंतर भाजपच्या अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या सर्व आरोपांचा समाचार घेतल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या-
politics : ‘कालच्या दसरा मेळाव्यात फडणवीसांनी लिहून दिलेले भाषण एकनाथ शिंदेंनी वाचून दाखवले’
Udit Narayan : गायक उदित नारायण यांना आला हृदयविकाराचा झटका? मॅनेजरने सांगीतले व्हायरल पोस्टमागील सत्य
Mukesh Ambani: अंबानी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक, म्हणाला होता, ‘अँटिलियाला उडवून देईन’