भाजप खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांची अडचण वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे.
राणा दाम्पत्याने घरच्या जेवणासाठी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. राणा दाम्पत्याने गुरुवारी सत्र न्यायालयात घरचं जेवण मिळावं यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र राणा दाम्पत्याचा हा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे राणा दाम्पत्याला आता घरच जेवण मिळणार नाहीये.
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी तुरुंगात घरच्या जेवणासाठी केलेला अर्ज मुंबईतील न्यायदंडाधिकारी कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्याला कोठडीत सर्वांना मिळणारे अन्नच ग्रहण करावे लागणार आहे.
घरचं नको, तुरुंगातलेच पौष्टिक जेवण खा,’ असे कोर्टाने सांगितले आहे. तुरुंग प्रशासनाने ‘तुरुंगामध्ये सर्व कैद्यांना सारखा आणि सकस आहार दिला जातो’ असे सांगितले. न्यायालयाने तुरुंग प्रशासनाचा हा दावा ग्राह्य मानत राणा दाम्पत्याची घरच्या जेवणाची मागणी फेटाळून लावली आहे.
त्यामुळे उद्या राणा दाम्पत्याला जामिन न मिळाल्यास पुढील आणखी काही दिवस त्यांना तुरुंगातीलच जेवण जेवावे लागणार आहे. तर दुसरीकडे, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणी आज निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्याच्या अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. ठाकरे सरकारने कुंडलीच काढली बाहेर काढली असून तब्बल 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोघांवर ठिकठिकाणी एकूण 21 गुन्हे दाखल असून त्यातील काही गंभीर स्वरुपाचे असल्याचे उघडकीस झाले आहे.
त्यामुळे राणा दाम्पत्याला जामीन देऊ नये, अशी मागणी सरकारच्यावतीने न्यायालयात करण्यात आली आहे. सरकारच्यावतीने अॅड. प्रदीप घरत कोर्टात बाजू मांडत आहेत. ‘रवी राणा यांच्याविरोधात 17 आणि नवनीत राणा यांच्याविरोधा सहा गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे, असे अॅड. प्रदीप घरत यांनी सांगितले.