राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज हे चांगलेच चर्चेत आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केले आहे. सत्तेत आल्यापासून भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचं ट्विट करत कंबोज यांनी खळबळ उडवून दिली होती. कंबोज यांच्या या व्यक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर कंबोज यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.
कंबोज यांनी थेट रोहित पवारांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. तर आता कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांना लक्ष केलं आहे. ‘विद्या ताई जय श्री राम’, असं खोचक ट्विट कंबोज यांनी केलं होतं. मात्र कंबोज यांच्या या ट्विटवर विद्या चव्हाण यांनी रोखठोक व्यक्तव्य केलं आहे.
कंबोज यांना लक्ष करताना विद्या चव्हाण यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. ‘निवडणूक काळात पैसे वाटपाच्या आरोपावेळी फडणवीसांच्या एका फोनमुळे मोहित कंबोजची सुटका झाली होती असा गंभीर आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. याबाबत त्या माध्यमांशी बोलत होत्या.
वाचा नेमकं विद्या चव्हाण यांनी काय म्हंटलंय?
विद्या चव्हाण यांनी सांगितलं की, “एका निवडणुकीदरम्यान मी दिंडोशी-मालाडमध्ये होते. तेव्हा नोटांनी भरलेली बॅग पोलिसांनी पकडली होती. आमचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. ती बॅग घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आले होते.’
तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला की, ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. तेव्हा मला कळालं की मोहित कंबोज हे भाजपचे नेते आहेत. तेव्हा फडणवीसांकडे गृहखातं असल्यामुळे ते वाचले”, असा गौप्यस्फोट विद्या चव्हाण यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर पांड्यावर फिदा झाला रोहीत; खुल्या दिलाने कौतूक करत म्हणाला…
माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस नेतृत्वाला सल्ला; ‘पवार साहेबांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा’
‘शरद पवार साहेबांनी अशी काही जादूची कांडी फिरवली होती की..,’ शिंदे गटाचे भरत गोगावले स्पष्टच बोलले
VIDEO: १० सेकंदात जमीनदोस्त केला ३२ मजली नोएडातील ट्वीन टॉवर, काय होतं कारण? वाचा