महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात पुन्हा एकदा राजकीय बाण सोडले जात आहेत. राज्याचे राजकारण दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे. जळगावमधील पाचोरा येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच राजकारणात घराणेशाहीचे समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता भाष्य केले.
या सभेत माजी आमदार दिवंगत आर.ओ. पाटील यांची कन्या वैशाली पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भावनिक भाषण केले. त्यांचा संदर्भ घेऊन उद्धव ठाकरे म्हणाले की, पाचोरा, जळगावच्या विकासात पाटील कुटुंब यांचे मोठे योगदान आहे. आताही परंपरा पाटील यांची मुलगी पुढे नेत आहे.
तसेच, घराणेशाहीमध्ये परंपरा असते. अरे तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. तू फकीर आहे. झोळी लटकवून निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातामध्ये भिकेचा कटोरा देऊन जाशील, त्यांचं काय करायचं? म्हणून घराण्याची परंपरा लागते. वारसा लागतो, असा टोला ठाकरेंनी नाव न घेता नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी गरिबांचा प्रधानसेवक आहे. बोलायला ठीक आहे. आमच्या सरकार देणार आहे. घेणार नाही, असा मिंदे म्हणतात, पण काय देता तुम्ही? असा सवाल त्यांनी विचारला आहे. इथल्या जनतेला विचारा मी तुम्हाला जवळचा वाटतो का? मिंधे गद्दार चोर तुम्हाला जवळचे वाटतात.
यादरम्यान, शिंदे सरकारमधील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची खिल्ली उडवत उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येकजण गुलबा टोळीतील नसतो. काही संजय राऊत यांच्यासारखेही आहेत. जे तुरुंगात जाऊनही झुकत नाहीत.
पुलवामा हल्लाबाबत माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष केला. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या टीकेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना याला काय उत्तर देणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
‘…तर मी सुद्धा नावाचा गुलाबराव नाही’, ठाकरेंची सभा संपताच गुलाबराव पाटलांनी दिले थेट ‘हे’ आव्हान
महाविकास आघाडी आज आहे, उद्याचं माहीत नाही, कारण…’; शरद पवारांनी टाकला राजकीय बॉम्ब