गेल्या दहा दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी स्वतः या चर्चेला पूर्णविराम दिला. शुक्रवारी पुण्यात दैनिक सकाळ समुहाच्या वतीने अजित पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील विविध मुद्द्यांवर भाष्य केला आहे.
‘दिलखुलास दादा’ या कार्यक्रमात अजित पवार यांची मुलाखत घेण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही दिवसांत मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळणार आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद देखील जाणार असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. अशातच आता अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
अजित पवार म्हणाले, मी मी म्हणणार्यांकडून द्रौपदी मुर्मू असा उल्लेख होतो. अगदी एमपीएससी आयोगाचा उल्लेख निवडणूक आयोग म्हणून होतो. ठिक आहे ते सुधारतील पण तोपर्यंत कदाचित त्यांच मुख्यमंत्री पद जाईल. असे म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या हटके स्टाईलने एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
तसेच, जर कोणाला मस्ती आली असेल, तर ती जिरवायची ताकद आपल्यात आहे. मी सकाळी सहा वाजता पण उद्घाटन करू शकतो. हा माझा वक्तशीरपणा आहे. सकाळी लवकर सहा वाजता विकास कामांची पाहणी करणे, कामाला सुरुवात करणे, ही काही माझी हौस नाही. तर जबाबदारी आहे, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्ष भाजपने उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्याच्या पहिल्या दिवसापासून पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे म्हणत पवार यांनी टिका केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या वेळी अधिकाऱ्यांना आमदारांना मातोश्रीवर आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहून आमदारांना सुरळीतपणे मुंबई सोडून दिली, असा खुलासा त्यांनी केला.
शिवसेनेतील बंडखोरीच्या काळात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आमदारांना सोबत ठेवले असते. तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले असते, असा टोलाही त्यांनी लगावला. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारे पुरंदरचे तत्कालीन आमदार विजय शिवतारे यांच्यावरही पवारांनी भाष्य केले.
महत्वाच्या बातम्या
‘सत्तेच्या नशेत भावना पण मेल्या आहेत’; उष्माघाताने लोकांचे जीव जात असताना सत्ताधाऱ्यांचे शाही जेवण
अजित पवारांचे बंड तर थांबवले पण सेनापतींसह सैन्य भाजपमध्ये दाखल; राष्ट्रवादीला मोठे खिंडार
‘आताच्या आता तातडीने मुंबईत हजर व्हा’, शिंदेंचे सर्व मंत्र्यांना निरोप; राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी