शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोरी नंतर राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय (political) वातावरण तापलं आहे. राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. या राजकीय घडामोडींमुळे सर्वसामान्यांना तर अक्षरशः वेड लागायची वेळ आली आहे. यादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे.
शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि शिंदे गटातील भरत गोगावले (Bharat Gogawle) यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
महाविकास आघाडीची तीन चाकावर चालणारी गाडी एकनाथ शिंदे यांनी मध्येच बंद पडली. एकनाथ शिंदे यांनी बंडोकरी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हा पासून ठाकरे गटाला मोठी गळती लागली. तर दुसरीकडे नुकतीच झालेली भेटी चर्चेत असुन तर्क वितर्क लावले जात आहेत.
राजकारणात कधी कोण कोणाचा शत्रू होईल आणि मित्र होईल, याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. त्यामुळे राजकारणात घडणाऱ्या घटना सर्व सामान्यांसाठी धक्कादायक असतात. शुक्रवारी (दि.३१) दुपारी शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतली.
उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती ट्विटर द्वारे ट्विट करून दिली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उदय सामंत आणि गोगावले यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्राध्यापक प्रदीप ढवळ हे देखील तेथे उपस्थित होते. ही बैठक कशा संदर्भात होती हे मात्र अद्यापही समोर आलेले नाही.
दरम्यान, अनेक घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिक मात्र चांगलेच वैतागले आहेत. पण आता नुकत्याच पार पडलेली ही बैठक राजकारणात काही नवी समीकरण तयार करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, असे म्हणत शिंदे गटाच्या नेत्यांनी पवारांवर खापर फोडलं होतं.
महत्वाच्या बातम्या
७ वेळा लोकसभा जिंकलेल्या महाराष्ट्र काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा मृत्यू; ऐन संकटात पक्षावर कोसळला दुखाचा डोंगर
कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार दणका तर ठाकरे गटाला दिला मोठा दिलासा
पांड्याच्या ‘या’ चालीपुढे धोनीची कॅप्टन्सी फेल, श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात गुजरातने चेन्नईला हरवले