Share

ठाकरे गटातील आणखी २ खासदार शिंदेगटात जाणार; मोदींच्या जवळच्या मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray Sad

Politics: महाराष्ट्रात ठाकरे आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. काही जणांनी ठाकरेंची साथ सोडत, शिंदेंना साथ दिली. ठाकरेंच्या अनेक आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी मोठे विधान केलं आहे.

ठाकरेंचे दोन खासदार ही त्यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत, असा गौप्यस्फोट पीयूष गोयल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे आणि शिंदे गटात सातत्याने एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहे. ठाकरे गटातील अनेक आमदारांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

आता आणखी दोन खासदार संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी दिली आहे. विधिमंडळात तर हम दो हमारे दो असेच राहतील. फक्त आडनाव वापरुन चालत नाही, आता घराणेशाही चालणार नाही. मेरिटनुसारच देश प्रगती केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण २०४७ पर्यंत विकासाचा मोठा टप्पा गाठू, अशी आशा पीयुष गोयल यांनी व्यक्त केली.

पीयुष गोयल म्हणाले, महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आणि ते चांगलं सरकार आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या काळात प्रलंबित ठेवलेले प्रकल्प आत्ताच सरकार व्यवस्थित मार्गी लावत आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची साथ सोडली यासाठी आम्ही जबाबदार नाही.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा मला अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बसण्याची संधी मिळते तेव्हा छान वाटते. जर एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचे झाले तर पीएम मोदी नंबर १ आहेत, ते हिरो नंबर १आहेत, त्यांनी देशाला पुढे नेण्याचे काम केले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबतही केंद्रीय मंत्र्यांनी आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले, राहुलने ओबीसी समाजाला दुखावले आहे, त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. काँग्रेस नेत्याने माफी मागावी असे सांगितले, पण त्यांनी माफी मागितली नाही.

महत्वाच्या बातम्या 
“देशासाठी प्राण हातावर घेऊन लढनारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली किड आहोत का?” पडळकर तुम्हाला माफी नाही
२०२४ च्या निवडणूकांसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जागावाटप कसं होणार? अमित शहा म्हणाले…
पुण्यात भीषण अपघात; दारूड्या पिकअप ड्रायव्हरने ८ जनांना चिरडलं, ५ लोकं जागीच

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now